बातम्या
देव ओळखण्याची पात्रता धर्म संस्कारांतून निर्माण करूया-हत्तरगी मठाचे मठाधीश डॉ.आनंद महाराज गोसावी
By nisha patil - 4/23/2026 12:52:02 PM
Share This News:
देव ओळखण्याची पात्रता धर्म संस्कारांतून निर्माण करूया-हत्तरगी मठाचे मठाधीश डॉ.आनंद महाराज गोसावी
(हसन तकीलदार):-
अग्रतः चतुरो वेदाः पृष्ठतः सशरं धनुः।
इदं ब्राह्मं इदं क्षात्रं शापादपि शरादपि॥
भगवान विष्णूनचा सहावा अवतार,न्याय, शस्त्र आणि शास्त्रात निपुण मानल्या जाणाऱ्या भ्रूगुकुलोत्पन्न भगवान परशुराम यांची जयंती अक्षय्यतृतीया रविवार दिनांक 19 एप्रिल 2026 रोजी चैतन्य हॉल मध्ये ब्राह्मण सभा, आजरा या संस्थेतर्फे उत्साहात साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणुन हत्तरगी मठाचे मठाधीश आदरणीय डॉ.आनंद महाराज गोसावी यांनी आपला अमूल्य वेळ देवून उपस्थित राहिले. त्यांच्या शुभ हस्ते भगवान परशुराम प्रतिमा पूजन व षोडशोपचार पूजा करण्यात आली.काल तिथीनुसार शिवजयंतीही होती या औचित्याने हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.त्याचप्रमाणे संत महात्मा बसवेश्वर यांनाही अभिवादन करण्यात आले.
संपूर्ण धार्मिक संस्कार असलेल्या या कार्यक्रमात महिला व पुरुष बांधवांनी हनुमान चालीसा व श्री विष्णुसहस्र नाम पठण केले. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी डॉ.आनंद महाराज गोसावी यांचा परिचय करून त्यांना स्वागतपर सप्रेम भेट ब्राह्मण सभा, आजरा चे विद्यमान अध्यक्ष श्रीपाद कुलकर्णी सौ. श्रद्धा कुलकर्णी आणि उपाध्यक्षा डॉ.सौ. अंजनी देशपांडे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.महाराजांनी आपल्या आशिर्वचनपर मनोगतातून धर्म, धर्मआचरण, संस्कार आणि आदर्श जीवन पद्धतीसाठी अंगीकाराव्या लागणार्या मूल्यांविषयी उद्बोधकबाबत भाष्य केले.
कार्यक्रमास उल्लेखनीय उपस्थिती व समाज जागरूकता या विषयी समाधान व्यक्त करून महाराजांनी सर्व उपस्थितांना चरण स्पर्श स्विकारून प्रसाद व आशिर्वाद दिला.महाराजांची या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणुन उपस्थित राहण्यास ज्यांनी बहुमोल सहकार्य केले त्या सुनील देसाई यांचाही गौरव करण्यात आला.याच कार्यक्रमात ब्राह्मण सभा आजरा मंडळाच्या नवीन कार्यकारिणीची घोषणा व पुढील जबाबदारी माजी अध्यक्ष जयवंत केळकर यांनी सुपूर्द केली व शुभेच्छा दिल्या.या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ज्यांनी ज्यांनी आपले बहुमोल योगदान दिले अशा सर्वांचे मनःपूर्वक आभार मानून https://web.whatsapp.com/ महिला हळदीकुंकू निमित्ताने देण्यात आलेल्या सुमधूर रस व कैरी डाळ यांचा आस्वाद घेत कार्यक्रमाची सांगता झाली सूत्रसंचालन व आभार शंकर आपटे यांनी केले. डॉ. दीपक सातोस्कर,डॉ.अनिल देशपांडे,शुभदा जोशी, जयवंत केळकर ब्राह्मण सभेचे खजिनदार संदीप वाटवे,सचिव विनय फळणीकर,चेतन केळकर,गौरव देशपांडे,नरेंद्र जोशी,अवधूत सबनीस,सोमनाथ भातखंडे, दीपक जोशी यांच्यासह सर्व समाज बांधव उपस्थित होते.
देव ओळखण्याची पात्रता धर्म संस्कारांतून निर्माण करूया-हत्तरगी मठाचे मठाधीश डॉ.आनंद महाराज गोसावी
|