राजकीय
हातकणंगलेत काँग्रेसचा झेंडा फडकवूया! — आमदार सतेज पाटील
By nisha patil - 11/27/2025 1:25:46 PM
Share This News:
हातकणंगलेत काँग्रेसचा झेंडा फडकवूया! — आमदार सतेज पाटील
“जनतेच्या प्रश्नांना न्याय देणारा नगराध्यक्ष हवा” — सतेज पाटील यांचे आवाहन
हातकणंगले नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या प्रचारार्थ काँग्रेस विधान परिषदेचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी आज प्रचारफेरीत सहभाग नोंदवला. कष्टकरी आणि सर्वसामान्यांच्या समस्यांना प्राधान्य देणारा नगराध्यक्ष हातकणंगलेला मिळणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
“दैनंदिन प्रश्नांना न्याय देणारा, नागरिकांच्या अडचणी तत्परतेने सोडवणारा काँग्रेसचा नगराध्यक्ष सभागृहात पाठवा आणि हातकणंगलेवर पुन्हा काँग्रेसचा झेंडा फडकवूया,” असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.
यावेळी त्यांनी राज्य सरकारवरही टीका केली. “सरकारची सध्याची परिस्थिती अशी आहे की केलेली आश्वासने केवळ निवडणुकीपुरतीच आहेत; प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्याची क्षमता त्यांच्याकडे नाही,” असे आमदार पाटील म्हणाले.
नगराध्यक्षांसह नगरसेवकही बहुमताने निवडून येतील, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.
हातकणंगलेत काँग्रेसचा झेंडा फडकवूया! — आमदार सतेज पाटील
|