बातम्या
कोल्हापूर जिल्ह्यातील १२ कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित
By nisha patil - 9/8/2025 12:44:38 PM
Share This News:
कोल्हापूर जिल्ह्यातील १२ कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित
कोल्हापूर, ८ ऑगस्ट : कृषी विभागाच्या अलीकडील तपासणी मोहिमेत जिल्ह्यातील काही कृषी सेवा केंद्रांकडून नियमबाह्यपणे ऑफलाइन पद्धतीने अनुदानित खतांची विक्री केल्याचे उघड झाले आहे.
ई-पॉस प्रणालीतील नोंदी आणि प्रत्यक्ष साठ्यात तफावत आढळल्याने १२ कृषी सेवा केंद्रांचे परवाने तात्पुरते निलंबित करण्यात आले. ही कारवाई विभागीय कृषी सहसंचालक बसवराज मास्तोळी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे आणि जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी राजेंद्र माने यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथकाने केली.
केंद्र शासनाच्या सूचनांनुसार अनुदानित युरिया, म्युरेट ऑफ पोटॅश, डीएपी, १०-२६-२६ यांसारख्या खतांची विक्री केवळ ई-पॉस यंत्राद्वारेच वैध आहे. विक्रेत्यांनी साठा प्रणालीवर उपलब्ध झाल्यानंतरच विक्री सुरू करावी, तसेच शेतकऱ्यांनीही खते खरेदी करताना ई-पॉस प्रणालीचा वापर करावा, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील १२ कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित
|