बातम्या
विवेकानंद मध्ये लेफ्टनंट सई जाधवचा सत्कार
By nisha patil - 12/24/2025 5:44:20 PM
Share This News:
विवेकानंद मध्ये लेफ्टनंट सई जाधवचा सत्कार
उत्कृष्टतेचा ध्यास क्षमतांना संधी देत जातो” - लेफ्टनंट सई जाधव
कोल्हापूर दि.24: विद्यार्थी दशेतील अभ्यासक्रमाच्या अध्ययनासोबत निरनिराळ्या स्पर्धांमध्ये भाग घेऊन स्वतःच्या क्षमतांना संधीचे व्यासपीठ निर्माण करून देत जावे. या मिळालेल्या संधी मधून स्वतःचा बौद्धिक भावनिक आणि मानसिक विकास करून आपल्या आवडत्या क्षेत्रात करिअर करता येते .देशसेवा आणि समाजसेवा यासाठी भारतीय सैन्यदल हे अतिशय उत्कृष्ट असे व्यासपीठ उपलब्ध करून देणारे माध्यम आहे . भारतीय सैन्यदलात राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी सीडीएस टेक्निकल एंट्री स्कीम, जज, ॲडव्होकेट आणि जनरल यामधून भारतीय संरक्षण क्षेत्रात कमिशन्ड ऑफिसर बनता येते. असे मत प्रमुख पाहुणे सत्कार मुर्ती महाविद्यालयाची माजी विद्यार्थीनी लेफ्टनंट सई जाधव यांनी आपला मनोगतात मांडले.
अध्यक्षीय मनोगतात श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष मा.प्राचार्य अभयकुमार साळुंखे म्हणाले, विद्यार्थीदशेतील हरहुन्नरीपणा यास धैर्य आणि संयमाची जोड दिली असता आपल्या उर्जेला योग्य सकारात्मक मार्ग देऊन अंतर्सिद्धी साधता येते आणि त्यासाठी परमपूज्य बापूजींच्या विचारानी गतिशील असलेली श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था आणि विवेकानंद कॉलेज हे सर्वोत्कृष्ट व्यासपीठ आहे. यातूनच विद्यार्थ्यांनी आपले चांगले करिअर घडवावे.
विवेकानंद शिक्षण केंद्र हे समाजाला उत्तम ध्येयदृष्टी असणारे विद्यार्थी देते. असे मत प्र. प्राचार्य डॉ एस. पी. थोरात यांनी प्रास्ताविकात मत मांडले. पाहुण्यांचे स्वागत आणि ओळख परीक्षा विभागप्रमुख डॉ.जी.जे.नवाथे यांनी केले. लेफ्टनंट जितेंद्र भरगोंडा यांनी आभार मानले .
सदर कार्यक्रम डॉ श्रुती जोशी, आय. क्यु. ए.सी. प्रमुख, मेजर सुनिता भोसले, प्रबंधक श्री सचिन धनवडे यांच्या नियोजनात यशस्वीपणे पार पडला. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन डॉ सुप्रिया पाटील यांनी केले सदर कार्यक्रमासाठी प्रा.गीतांजली साळुंखे, प्राध्यापक, मेजर संदीप जाधव परिवार, एनसीसी छात्र, पालक ,विद्यार्थी मोठ्या संख्येनी उपस्थित होते .
विवेकानंद मध्ये लेफ्टनंट सई जाधवचा सत्कार
|