बातम्या
*मतिमंद महिलेच्या लैंगिक अत्याचार प्रकरणी आरोपीस आजन्म कारावास
By Administrator - 6/11/2026 8:50:27 PM
Share This News:
*मतिमंद महिलेच्या लैंगिक अत्याचार प्रकरणी आरोपीस आजन्म कारावास
*आजरा(हसन तकीलदार):- हारुर (ता.आजरा) येथील मतीमंद महिलेचा लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी गुन्ह्यातील आरोपी संतोष तुकाराम रेडेकर याला न्यायालयाने आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावली आहे.
यातील पिडीत महिला ही मतीमंद होती.सदर महिला दिवाळी सणासाठी नातेवाईकांच्याकडे हारुर गावी आली होती . त्यावेळी आरोपी संतोष तुकाराम रेडेकर याने पिडीत महिलेला खावु देतो असे सांगून आपले घरात बोलावून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला होता. त्याबाबत आजरा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता.त्यावेळी या गुन्ह्याचा तपास सपोनि नागेश यमगर यांनी केला होता.
अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय गडहिंग्लज कोर्ट नं.2 न्यायाधीश वैभव पाटील यांनी निकाल देत गुन्ह्यातील आरोपी संतोष तुकाराम रेडेकर (वय वर्षे ४७ रा. हारूर ता. आजरा ) यास दोषी ठरवून आजन्म कारावासाची व ५० हजार रुपये दंड तसेच दंड न भरल्यास सहा महिने कारावास तसेच अपंग व्यक्तींच्या हक्कानुसार पाच वर्षे सक्त मजुरीची शिक्षा व दहा हजार रुपये दंड, दंड न भरल्यास दोन महिने कारावास, तसेच पिडीत महिलेला ६० हजार रुपये नुकसान भरपाईची शिक्षा सुनावली आहे.
जिल्हा न्यायालयात सरकारतर्फे ॲड.सुनिल तेली यांनी युक्तीवाद केला.तर केस ऑफीसर म्हणून आजरा पोलीस ठाणेचे सहायक पोलीस निरीक्षक बाबासाहेब सरवदे आणि कौर्ट पैरवी अधिकारी म्हणून महिला पोलीस हेडकॉन्स्टेबल जयश्री कांबळे यांनी काम पाहिले.
*मतिमंद महिलेच्या लैंगिक अत्याचार प्रकरणी आरोपीस आजन्म कारावास
|