बातम्या
पडळमध्ये ‘बापू बिरू वाटेगावकर’चा सजीव देखावा; ३५ पात्रांचा सहभाग!
By nisha patil - 9/21/2026 4:39:05 PM
Share This News:
पडळमध्ये ‘बापू बिरू वाटेगावकर’चा सजीव देखावा; ३५ पात्रांचा सहभाग!
मुलींवर होणारे निर्घृण अत्याचार ही केवळ एक घटना नसून, ती माणुसकीला काळिमा फासणारी बाब आहे. बदलापूर असो किंवा नसरापूर, अशा घटनांविरोधात समाजाने आवाज उठवण्याची गरज आहे. याच ज्वलंत सामाजिक विषयाला सजीव देखाव्याच्या माध्यमातून प्रभावीपणे मांडण्याचा प्रयत्न नवक्रांती तरुण मंडळ (वाडी गल्ली), पडळ यांच्याकडून करण्यात आला.
पडळ येथे ‘बोरगावचा ढाण्या वाघ बापू बिरू वाटेगावकर’ यांच्यावर आधारित सजीव देखावा सादर करण्यात आला. या देखाव्यात सामाजिक अन्याय, अत्याचार आणि त्याविरोधातील संघर्षाचा प्रभावी संदेश देण्यात आला. सादरीकरणातील प्रसंगांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेत सामाजिक प्रश्नांवर विचार करण्यास भाग पाडले.
या सजीव देखाव्यात तब्बल ३५ पात्रांनी सहभाग घेतला. कलाकारांच्या प्रभावी अभिनयासोबतच पडद्यामागे मेहनत घेणाऱ्या कार्यकर्त्यांचे योगदानही महत्त्वाचे ठरले. ज्येष्ठ नागरिकांनी दिलेल्या मार्गदर्शन आणि पाठिंब्यामुळे हा उपक्रम यशस्वीपणे पार पडला. मनोरंजनासोबत सामाजिक संदेश देणाऱ्या या सजीव देखाव्याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. नवक्रांती तरुण मंडळाने गणेशोत्सवाच्या माध्यमातून ज्वलंत सामाजिक विषयाला वाचा फोडत समाजाला संवेदनशील राहण्याचा संदेश दिला.
पडळमध्ये ‘बापू बिरू वाटेगावकर’चा सजीव देखावा; ३५ पात्रांचा सहभाग!
|