बातम्या

लाईनमन हा महावितरणचा शिलेदार - मुख्य अभियंता स्वप्नील काटकर

Lineman is the backbone of Mahavitaran  Chief Engineer Swapnil Katkar


By Administrator - 5/3/2026 12:37:21 PM
Share This News:



लाईनमन हा महावितरणचा शिलेदार - मुख्य अभियंता स्वप्नील काटकर

महावितरणमध्ये लाईनमनदिन उत्साहात साजरा

कोल्हापूर :- ऊन, वारा, पाऊस अशा कठिण प्रसंगावर मात करत लाईनमन अहोरात्र परिश्रम घेऊन आपले वीजसेवेचे कर्तव्य बजावित असतात. लाईनमन हा महावितरणचा शिलेदार आहे. महावितरणचा मावळा स्मार्ट बनत आहे, असे प्रतिपादन मुख्य अभियंता स्वप्नील काटकर यांनी केले.

महावितरण कोल्हापूर परिमंडळल कार्यालयात (दि.०४ मार्च) लाईनमन दिवस साजरा करण्यात आला. त्यावेळी स्वप्नील काटकर बोलत होते. याप्रसंगी मंचावर कार्यक्रमाचे प्रमुख पाहूणे सयाजीराव पाटील, अधीक्षक अभियंता गणपत लटपटे, पुनम रोकडे, सहाय्यक महाव्यवस्थापक शशिकांत पाटील, विजय गुळदगड यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच कार्यकारी अभियंते सुनिल गवळी, म्हसु मिसाळ, सुधाकर जाधव, अजित अस्वले, अशो‍क जाधव यावेळी उपस्थित होते. यावेळी सर्व लाईनमनचा सन्मान करण्यात आला. विद्युत सुरक्षा शपथ घेण्यात आली. कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात महावितरणात ठिकठिकाणी लाईनमन दिवस विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला.

पुढे बोलताना स्वप्नील काटकर म्हणाले ‘लाईनमन हा महावितरणचा मावळा आहे. वाहीनीवरील बिघाड त्वरीत निपटारा करत वीज ग्राहकांना चांगली सेवा देण्याचे काम लाईनमन करत आहे. विद्युत वाहिनीवर काम करताना लाईनमन स्वतःच्या सुरक्षेला प्राधान्य देत आहेतच, वीज ग्राहाकांमध्येही विद्युत सुरक्षेबाबत प्रबोधन करत आहेत. काळानुरूप विद्युत क्षेत्रात सूरू असलेल्या नवीन बदलत्या तंत्रज्ञानाचे लाईनमन प्राप्त करत आहेत. महावितरणचा मावळा ग्राहक सेवेत स्मार्ट बनत असून अर्थिक नियोजन करणे महत्वाचे आहे. मागील इतिहासाप्रमाणे कोल्हापूर परिमंडल मार्च अखेर शुन्य थकबाकी करणार असेही काटकर म्हणाले. 

प्रमुख पाहुणे सयाजीराव पाटील यांनी प्रत्येकाने जीवनात आर्थिक नियोजन कशा प्रकारे करावे याबाबत मार्गदर्शन केले.  उपकार्यकारी अभियंता (प्रशिक्षण व सुरक्षा) रत्नाकर मोहिते यांनी सुरक्षेबाबत प्रबोधन केले व विद्युत वाहिनीवर काम करताना बाळगण्याच्या सुरक्षीतते संदर्भात माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी (प्र.) आप्पासाहेब पाटील यांनी केले. स्वागत व सूत्रसंचालन मुख्य लिपीक शकिल महात यांनी तर आभार प्रदर्शन कोल्हापूर मंडलाचे व्यवस्थापक (मासं) दिपक भोसले यांनी केले.
 

 


लाईनमन हा महावितरणचा शिलेदार - मुख्य अभियंता स्वप्नील काटकर
Total Views: 51