ताज्या बातम्या

आजरा साखरवर लायन्स क्लब गडहिंग्लज तर्फे वाहनांना रिफ्लेक्टर वाटप

Lions Club Gadhinglaj distributes reflectors to vehicles at Ajra Sakhar


By nisha patil - 3/1/2026 1:05:40 PM
Share This News:



  आजरा(हसन तकीलदर):- वाहतूक सुरक्षा सप्ताहाचे तसेच क्लबच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाचे औचित्य साधत लायन्स क्लब गडहिंग्लज तर्फे वसंतराव देसाई आजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्यावर ट्रॅक्टर, छकडी आणि ट्रक या वाहनासाठी रिफ्लेक्टर वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला.
        लायन्स क्लब गडहिंग्लजची स्थापना सन 1976 मध्ये झाली आहे. सुवर्णमहोत्सवी वर्षात पदार्पण आणि वाहतूक सुरक्षा सप्ताहाचे औचित्य साधत सामाजिक बांधिलकी जपत विधायक कार्य म्हणून क्लब तर्फे आजरा साखर कारखान्यावर वाहनासाठी रिफ्लेक्टर वाटप करण्यात आले. लायन्स क्लब ही आंतरराष्ट्रीय संघटना जवळ जवळ 214 देशात कार्यरत आहे. गडहिंग्लजमध्ये लायन्स क्लब तर्फे एक रक्त पेढीसुद्धा चालवली जाते.

वृक्षरोपण तसेच इतर अनेक विधायक कार्यात लायन्स क्लब अग्रेसर असून माजी प्रांतपाल लायन अण्णासाहेब गळतगे यांचे मार्गदर्शनाखाली कायमस्वरूपी गेली 25 वर्षे कायमस्वरूपी हा प्रकल्प अविरतपणे सुरु असलेबाबत गडहिंग्लज लायन्स क्लबचे अध्यक्ष विनायक गळतगे यांनी आमच्या प्रतिनिधीला सांगितले.
    यावेळी लायन कळगोंडा पाटील, लायन राजेंद्र वडगुले यांच्यासह कारखान्याचे कार्यकारी संचालक एस.के.सावंत, मुख्यशेतीअधिकारी विक्रमसिंह देसाई, ऊसपुरवठा अधिकारी अजित उर्फ राजू देसाई, शेतीविभागचे मुख्य क्लार्क संदीप कांबळे, केनयार्ड सुपरवायझर तुकाराम मोळे तसेच शेती - केनयार्ड चे कर्मचारी व वाहतूकदार उपस्थित होते.


आजरा साखरवर लायन्स क्लब गडहिंग्लज तर्फे वाहनांना रिफ्लेक्टर वाटप
Total Views: 14