बातम्या
साहित्यामुळे माणूस सुदृढ बनतो - प्रदीप पाटील
By nisha patil - 12/28/2025 5:21:48 PM
Share This News:
साहित्यामुळे माणूस सुदृढ बनतो - प्रदीप पाटील
शिरढोण प्रतिनिधी/(संजय गायकवाड)ता.२८. मानवी जीवनात साहित्याचे स्थान खूप महत्वाचे असून माणूस घडण्यासाठी आणि समृद्ध होण्यासाठी साहित्याची नितांत आवश्यकता आहे. साहित्य हेच काळाचे भान देते. आणि साहित्यामुळे माणूस सुदृढ बनतो. नवसमाज निर्मितीसाठी वाचन संस्कृती रुजली पाहिजे. माणसाच्या जीवनाला अर्थपूर्णता देण्याचे कार्य साहित्यामुळे होते म्हणून लेखन आणि वाचन या दोन्ही गोष्टी जीवन जगताना आवश्यक आहेत. यासाठी साहित्यकांनी देखील चांगले लिखाण केले पाहिजे. असे प्रतिपादन साहित्यिक प्रदीप पाटील (ईश्वरपूर) यांनी केले.
शिरढोण (ता. शिरोळ) येथील साहित्य परिषदेच्या वतीने आयोजित १२ वे संवाद ग्रामीण साहित्य संमेलनात संमेलन अध्यक्ष म्हणून पाटील बोलत होते. प्रारंभी सकाळी उद्यान पंडित गणपतराव पाटील यांच्या हस्ते ग्रंथ दिंडीचे उदघाटन करण्यात आले. गावातील प्रमुख मार्गावरून पारंपारिक वाद्यांच्या गजरात ग्रंथदिंडी काढण्यात आली.प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक अध्यक्ष विश्वास बालीघाटे यांनी केले
यावेळी विकास शिंगे यांना शिरढोण भूषण पुरस्कार, वजीर रेस्क्यू फोर्स यांना सामाजिक कार्य तर डॉ. सुनिल पाटील यांना सेवारत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कवी भारत सातपुते, मनोहर भोसले व कवी रंगराव बन्ने यांना स्व. पारिसा बालिघाटे स्मृती साहित्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.श्रीपती कांबळे यांचे 'निवृत्ताच्या कविता' या कवितासंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले.
दुपारच्या सत्रात प्रा.शांतीनाथ मांगले व मारूती मांगोर यांनी कथाकथन केले. कवी वसंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली निमंत्रित कवींचे कवी संमेलन झाले. यावेळी शिवाजी गायकवाड, विजय पोवार, रंगराव बन्ने, श्रीपती कांबळे, मनोहर भोसले, शशिकांत मुद्दापुरे सच्चिदानंद आवटी, डॉ. ज्ञानेश्वर कांबळे, संजय सुतार. देवर्षी पाटील आदींनी कवीता सादरीकरण केले.
या साहित्य संमेलनाला अविनाश पाटील, बाबूराव कोईक, दादासो चौगुले, ललिता जाधव,डॉ. कुमार पाटील, संजय मालगांवे, विलास चौगुले, जगन्नाथ बिरोजे, संतोष सैसाले, लता काकडे, कमल बिरोजे यांच्यासह साहित्यप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संमेलनाचे सुत्रसंचलन शेखर कलगी यांनी केले. आभार डॉ. ज्ञानेश्वर कांबळे यांनी मानले केले.
साहित्यामुळे माणूस सुदृढ बनतो - प्रदीप पाटील
|