बातम्या
वारुळ येथे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची मोठी कारवाई :
By nisha patil - 9/29/2025 6:14:58 PM
Share This News:
वारुळ येथे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची मोठी कारवाई :
1.16 कोटींचा मुद्देमाल जप्त, गोवा बनावटीच्या बनावट दारूसह ट्रक ताब्यात
कोल्हापूर (दि.29 सप्टेंबर 2025) : कोल्हापूर जिल्ह्यातील अवैध दारू वाहतुकीवर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने मोठा धडाका देत तब्बल 1 कोटी 16 लाख 61 हजार 032 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये गोवा बनावटीची विदेशी दारू, आयशर ट्रक व इतर साहित्याचा समावेश आहे.
ही कारवाई शाहुवाडी तालुक्यातील वारुळ गावच्या हद्दीत करण्यात आली. ट्रक (एमएच 18-बीए-8511) थांबवून तपासणी केली असता 1 कोटी 4 लाख 56 हजार 032 रुपयांची गोवा बनावटीची दारू मिळून आली. आरोपी चालक संतोष बंडू पेटकर (रा. शिराळा नाका, इस्लामपूर, जि. सांगली) याला ताब्यात घेण्यात आले असून ट्रक प्रल्हाद लिंबा धनगर (रा. शिरपूर, जि. धुळे) याचा मालकीचा असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
दारूचा साठा :
237 बॉक्स पोलांड प्राईड रिझर्व व्हिस्की (180 मिली) – 11,376 नग
253 बॉक्स पोलांड प्राईड ऑरेंज ओडता (180 मिली) – 12,144 नग
372 बॉक्स पोलांड प्राईड प्रिमीयम कलेक्शन रिझर्व व्हिस्की (180 मिली) – 17,856 नग
223 बॉक्स पोलांड प्राईड प्रिमीयम कलेक्शन रिझर्व व्हिस्की (180 मिली) – 10,704 नग
296 बॉक्स पोलांड प्राईड प्रिमीयम कलेक्शन रिझर्व व्हिस्की (750 मिली) – 3,552 नग
एकूण 1380 बॉक्स विदेशी दारू जप्त करण्यात आली असून महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये शाहुवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक योगेश कुमार सो व अपर पोलीस अधीक्षक वी. धीरजकुमार सो यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, सहा. पोलीस निरीक्षक सागर वाघ, पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे तसेच अमंलदार सुरेश पाटील, रामचंद्र कोळी, रुपेश माने, विनोद कांबळे, रोहीत मर्दाने, सतिश सुर्यवंशी, संजय पडवळ व अमर वासुदेव यांच्या पथकाने केली.
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या या कारवाईमुळे कोल्हापूर जिल्ह्यातील अवैध दारू वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण झाला आहे.
वारुळ येथे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची मोठी कारवाई :
|