बातम्या
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची धामधूम : जिल्ह्यात १३ ठिकाणी निवडणूक अधिकाऱ्यांची नियुक्ती
By nisha patil - 7/11/2025 5:48:39 PM
Share This News:
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची धामधूम : जिल्ह्यात १३ ठिकाणी निवडणूक अधिकाऱ्यांची नियुक्ती
कोल्हापूर | जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी वेगात सुरू झाली आहे. जिल्ह्यातील १ ‘ब’ वर्ग, ९ ‘क’ वर्ग नगरपरिषदा आणि ३ नगरपंचायतींसाठी निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी, सहाय्यक आणि अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अशी ३७ अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे.
प्रभाग रचना, निवडणूक प्रक्रिया आणि प्रशासनिक कामकाज कर्तव्यदक्ष व निष्पक्षपणे पार पाडण्यासाठी हे अधिकारी नेमण्यात आले आहेत. मलकापूर, शिरोळ नगरपरिषद आणि चंदगड नगरपंचायतीचे मुख्याधिकारी पद रिक्त असल्याने त्या ठिकाणी पर्यायी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील एकूण १० नगरपरिषद आणि ३ नगरपंचायतींसाठी सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून, जिल्हा प्रशासनाने तयारीला गती दिली आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची धामधूम : जिल्ह्यात १३ ठिकाणी निवडणूक अधिकाऱ्यांची नियुक्ती
|