राजकीय

स्थानिक स्वराज्य रणधुमाळी : पन्हाळा नगरपरिषदेत गटबाजी, बिनविरोधी चर्चा रंगतेय

Local self government battle


By nisha patil - 4/10/2025 9:25:26 AM
Share This News:



स्थानिक स्वराज्य रणधुमाळी : पन्हाळा नगरपरिषदेत गटबाजी, बिनविरोधी चर्चा रंगतेय

पन्हाळा प्रतिनिधी – शहाबाज मुजावर पन्हाळगडावर खास ‘क’ वर्ग गिरीस्थान नगरपरिषद 1954 मध्ये स्थापन झाली. तेव्हापासून आजपर्यंत गडावर 12 वेळा प्रशासक व 29 नगराध्यक्ष झाले आहेत. पहिले लोकनियुक्त नगराध्यक्ष विजय पाटील (2001) तर पहिल्या लोकनियुक्त महिला नगराध्यक्षा सौ. रूपाली धडेल (2016) ठरल्या.

गडावरील राजकारण सुरुवातीपासूनच भोसले, पाटील व मोकाशी या गटाभोवती फिरत आलं. 2006 मध्ये जनसुराज्य पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आमदार विनयराव कोरे यांनी तीन गट एकत्र आणून पन्हाळा नगरपरिषदेवर पहिल्यांदा बिनविरोध सत्ता स्थापन केली होती. 2015 पर्यंत जनसुराज्य पक्षाची एकहाती सत्ता राहिली; मात्र नंतर पक्षातच गटबाजी निर्माण झाली.

सध्या नगरपरिषदेत जनसुराज्य पक्षाचे वर्चस्व असले तरी अंतर्गत दोन गट पडल्याने विरोधकांना संधी मिळण्याची शक्यता आहे. भोसले-मोकाशी गट एकत्र आले, तर जनसुराज्य विरोधकांचाही नगराध्यक्ष होऊ शकतो, अशी चर्चा आहे. माजी आमदार सत्यजित पाटील, विद्यमान आमदार सतेज पाटील तसेच भाजपची भूमिका काय राहील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, 6 ऑक्टोबरला होणाऱ्या आरक्षणाच्या निकालावरच नगरपरिषदेचे पुढील राजकीय चित्र स्पष्ट होणार आहे. सर्वसाधारण आरक्षण पडल्यास गडावर चुरस वाढणार असून, अन्यथा पन्हाळा नगरपरिषद पुन्हा एकदा बिनविरोध होण्याची शक्यता चर्चेत आहे.


स्थानिक स्वराज्य रणधुमाळी : पन्हाळा नगरपरिषदेत गटबाजी, बिनविरोधी चर्चा रंगतेय
Total Views: 41