बातम्या
जिल्हा समाज कल्याण कार्यालयामार्फत लोकशाही दिनाचे आयोजन नागरिकांनी आपल्या तक्रारी सादर कराव्यात
By nisha patil - 4/16/2025 9:33:40 PM
Share This News:
जिल्हा समाज कल्याण कार्यालयामार्फत लोकशाही दिनाचे आयोजन नागरिकांनी आपल्या तक्रारी सादर कराव्यात
सामाजिक न्याय विभागामार्फत जिल्हास्तरीय कार्यालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांच्या तक्रारींचे निराकरण करण्याकरिता जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद कार्यालयाच्या वतीने दिनांक 17 एप्रिल 2025 रोजी सकाळी 10 ते दुपारी 1:30 या कालावधीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सामाजिक न्याय भवन, विचारे माळ, कावळा नाका येथे लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येत असून जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी आपल्या तक्रारी लोकशाही दिनामध्ये सादर कराव्यात, असे आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी संभाजी पोवार यांनी केले आहे
समाज कल्याण विभागाशी संबंधित योजनांच्या अनुषंगाने लोकशाही दिनाचे आयोजन करणे त्यात निर्णय क्षमता आणि सर्वांच्या सहकार्यातून उत्तम प्रशासन कार्यान्वित करण्याबाबत पारदर्शक गतिमान लोकाभिमुख प्रशासन नागरिकांना उपलब्ध करण्यासाठी कार्यालयीन गतिमानता अभियान राबविण्याच्या अनुषंगाने शंभर दिवसाची कार्यालयीन सुधारणा विशेष मोहीम राबविण्यात येत असल्याचे श्री. पोवार यांनी पत्रकाव्दारे कळविले आहे.
जिल्हा समाज कल्याण कार्यालयामार्फत लोकशाही दिनाचे आयोजन नागरिकांनी आपल्या तक्रारी सादर कराव्यात
|