बातम्या

लोकशाहीर विठ्ठल उमप फौंडेशनच्या वतीने १५ वा 'मृदुगंध' पुरस्कार वितरण सोहळा

Lokshahir vittal umap fondation


By nisha patil - 11/16/2025 11:51:33 PM
Share This News:



*लोकशाहीर विठ्ठल उमप फौंडेशनच्या वतीने १५ वा 'मृदुगंध' पुरस्कार वितरण सोहळा

दिनांक २६ रोजी रविंद्र नाट्य मंदिर मुंबई येथे*

लोकशाहीर विठ्ठल उमप स्मृतीप्रित्यर्थ आपापल्या क्षेत्रात अमीट असा ठसा उमटवणार्या विविध कलांतील कलावंतांना पुरस्काराने सन्मानित करण्यात येते यावर्षी जीवन गौरव पुरस्कार हा गझलगायक भीमराव पांचाळ यांना तर लोककलेतील उल्लेखनीय कार्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातील शिवशाहीर डॉ पुरुषोत्तम उर्फ राजू कृष्णाजी राऊत (आर्टिस्ट) यांना तर. (अभिनेता) जयवंत वाडकर (नवोन्मेष प्रतिभा) : रिंकु राजगुरू, (दिग्दर्शन):परेन मोकाशी, (अभिनेत्री)निर्माती: मधुगंधा कुलकर्णी,(शिल्पकार). प्रदीप शिंदे आदी मान्यवरांचा समावेश आहे.असे पत्रक लोकशाहीर विठ्ठल उमप फौंडेशनच्या वतीने महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक/अभिनेते नंदेश वत्सला विठ्ठल उमप यांनी प्रसिद्धीस दिले आहे.

  याप्रसंगी लोकशाहीर विठ्ठल उमप यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी महाराष्ट्रातील नामवंत कलाकार गायन,वादनाचे माध्यमातून हजर रहाणार आहेत.


लोकशाहीर विठ्ठल उमप फौंडेशनच्या वतीने १५ वा 'मृदुगंध' पुरस्कार वितरण सोहळा
Total Views: 38