आरोग्य

ICU-व्हेंटिलेटरवर लुट थांबणार; खर्च आधी, कुटुंबीयांची संमती अनिवार्य

Looting on ICU ventilators will stop Expenses first family consent mandatory


By nisha patil - 12/22/2025 1:34:50 PM
Share This News:



नवी दिल्ली : केंद्र सरकारने जारी केलेल्या नवीन आरोग्य सेवा नियमांनुसार आता कोणत्याही रुग्णाला आयसीयू किंवा व्हेंटिलेटरवर ठेवण्यापूर्वी त्या रुग्णालयांना खर्चाची संपूर्ण माहिती आणि प्राथमिक लेखी परवानगी घ्यावी लागणार आहे.

नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार वैद्यकीय कर्मचारी रुग्णाच्या कुटुंबियांना व्हेंटिलेटर का लागणार आहे, त्याचे फायदे-जोखे आणि किती वेळ लागत असेल याची पूर्ण माहिती देणे बंधनकारक असेल.

याशिवाय आयसीयू व व्हेंटिलेटर सेवांचा दररोजचा खर्च आधीच स्पष्टपणे सांगावा लागेल, जेणेकरून अचानक आर्थिक भाराची परिस्थिती निर्माण होणार नाही. या नियमांतर्गत खाजगी रुग्णालयांना व्हेंटिलेटरशी संबंधित सर्व खर्चाची माहिती रुग्णालयाच्या वेबसाइट, आयसीयूच्या बाहेर आणि बिलिंग विभागात प्रदर्शित करणे आवश्यक केले आहे. तसेच रुग्णालयांनी तक्रार निवारण यंत्रणा उभारावी लागेल, जिथे कुटुंबीय उपचार किंवा बिलाबाबत तक्रार नोंदवू शकतील. हे नियम पारदर्शकता वाढवण्यासाठी आहेत आणि सामान्य जनतेला अनपेक्षित आर्थिक तणावापासून वाचवण्याचा उद्देश ठेवतात.


ICU-व्हेंटिलेटरवर लुट थांबणार; खर्च आधी, कुटुंबीयांची संमती अनिवार्य
Total Views: 51