बातम्या

आमदार राजेश क्षीरसागर यांच्या निवासस्थानी गणरायाचे उत्साहात आगमन

Lord Ganesha arrives with great enthusiasm at MLA Rajesh Kshirsagars residence


By nisha patil - 9/14/2026 8:53:09 PM
Share This News:



आमदार राजेश क्षीरसागर यांच्या निवासस्थानी गणरायाचे उत्साहात आगमन

कुटुंबीयांसह भक्तिभावाने श्री गणेशाची प्रतिष्ठापना

कोल्हापूर : राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष तथा आमदार राजेश क्षीरसागर यांच्या निवासस्थानी आज श्री गणरायाचे भक्तिमय वातावरणात आगमन झाले. ढोल-ताशांचा गजर, मंगलमय वातावरण आणि गणेशभक्तांच्या उपस्थितीत बाप्पाचे स्वागत करण्यात आले.

आमदार राजेश क्षीरसागर यांनी कुटुंबीयांसह श्री गणेशमूर्तीची विधिवत पूजा-अर्चा करून प्रतिष्ठापना केली. यावेळी परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. ‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया’च्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला. यावेळी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या माजी कोषाध्यक्षा सौ वैशाली क्षीरसागर, नगसेवक ऋतुराज क्षीरसागर, युवानेते पुष्कराज क्षीरसागर, सौ. दिशा क्षीरसागर, सौ. पूजा क्षीरसागर, कु. कृष्णराज, कु. आदिराज यांच्यासह कुटुंबीय उपस्थित होते.

यावेळी बोलताना आमदार राजेश क्षीरसागर यांनी गणरायाच्या चरणी कोल्हापूरसह संपूर्ण महाराष्ट्राच्या सुख, समृद्धी, आरोग्य आणि विकासासाठी प्रार्थना केली. गणेशोत्सव हा सामाजिक एकोपा, बंधुभाव आणि सकारात्मकतेचा संदेश देणारा उत्सव असून, सर्वांनी पर्यावरणपूरक आणि शांततेत गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन त्यांनी केले.

गणरायाच्या आगमनानिमित्त क्षीरसागर यांच्या निवासस्थानी दर्शनासाठी पदाधिकारी, कार्यकर्ते, मित्रपरिवार तसेच नागरिकांनी उपस्थिती लावली.


आमदार राजेश क्षीरसागर यांच्या निवासस्थानी गणरायाचे उत्साहात आगमन
Total Views: 7