बातम्या
ऑनलाईन पार्सल फसवणुकीत २ लाखांहून अधिकाची हानी
By Administrator - 10/13/2025 4:56:06 PM
Share This News:
ऑनलाईन पार्सल फसवणुकीत २ लाखांहून अधिकाची हानी
डिलिव्हरी बॉय आणि मित्र अटक
कोल्हापूर – नामांकित ऑनलाईन कंपन्यांकडून मागविलेल्या महागड्या इलेक्ट्रॉनिक वस्तू स्वतःकडे ठेवून रिकामे बॉक्स परत करणाऱ्या डिलिव्हरी बॉयसह त्याच्या मित्रावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित अभय महेश करनूरकर (रा. सिद्धार्थनगर) आणि त्याचा मित्र अमीर सोहेल मकानदार (रा. केसापूर पेठ) यांनी मिळून २ लाख ६ हजार रुपयांची फसवणूक केली, अशी फिर्याद प्रकाश रतिलाल शहा (रा. बिबवेवाडी, पुणे) यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात दिली.
फिर्यादीच्या माहितीप्रमाणे, अभय करनूरकर ऑनलाईन कंपनीत काम करत असून, २७ फेब्रुवारी ते १५ मे दरम्यान महागडे मोबाईल, डिजिटल वॉच, एअरपॅड्स यांचे ऑर्डर करून ते मित्र अमीरला देत असे. नंतर कंपनीला पार्सल रिकामे आले असे सांगून परत पाठवत असे आणि वस्तू स्वतःकडे ठेवत असे. सीसीटीव्ही तपासानंतर फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला. संशयितांनी वस्तू नंतर ५० टक्के किंमतीत विकल्याचेही समोर आले आहे.
शाहूपुरी पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहेत.
ऑनलाईन पार्सल फसवणुकीत २ लाखांहून अधिकाची हानी
|