शैक्षणिक
नवीन कामगार संहितांवरील एमडीपी कार्यक्रम संपन्न
By nisha patil - 4/1/2026 11:37:56 AM
Share This News:
कोल्हापूर:- शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथील यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ रूरल डेव्हलपमेंट, अर्थशास्त्र विभाग आणि उद्योजकता व कौशल्य विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने, PM-USHA व Rotary Club यांच्या सहकार्याने “नवीन कामगार संहिता व त्याचे व्यवस्थापकीय परिणाम” या विषयावर व्यवस्थापन विकास कार्यक्रम (MDP) यशस्वीपणे पार पडला.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ. संतोष भावे (माजी एच.आर., भारत फोर्ज, पुणे) होते. आपल्या मार्गदर्शनपर भाषणात त्यांनी सांगितले की, नवीन कामगार संहिता अंमलात आली असून, एच.आर. व्यावसायिक व व्यवस्थापकांनी संघटनांमध्ये ती विलंब न करता प्रभावीपणे अंमलात आणण्यासाठी सज्ज राहणे आवश्यक आहे. या संहितांमुळे उद्योग व्यवस्थापन, कर्मचारी संबंध व कार्यपद्धतींमध्ये सकारात्मक बदल घडून येतील, असेही त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाचे स्वागतपर भाषण डॉ. नितीन माळी (प्रभारी संचालक, यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ रूरल डेव्हलपमेंट) यांनी केले. अध्यक्षीय भाषण डॉ. महादेव देशमुख (प्रभारी अधिष्ठाता) यांनी केले.
या एमडीपी कार्यक्रमाचे संयोजन डॉ. दिग्विजय पाटील व प्रा. प्रताप खोत यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. अर्पिता विद्नूरकर यांनी केले, तर डॉ. आर. जी. पवार यांनी आभारप्रदर्शन केले. कार्यक्रमास विविध क्षेत्रांतील अभ्यासक, व्यवस्थापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नवीन कामगार संहितांवरील एमडीपी कार्यक्रम संपन्न
|