बातम्या
कोल्हापूर शहरातील प्रलंबित प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी आमदार अमल महाडिक यांच्या सूचना
By nisha patil - 8/22/2025 6:26:14 PM
Share This News:
कोल्हापूर शहरातील प्रलंबित प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी आमदार अमल महाडिक यांच्या सूचना
कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील विविध प्रलंबित प्रश्न, विकासकामे व सोयीसुविधांचा आढावा घेण्यासाठी आमदार अमल महाडिक यांनी आयुक्त के. मंजूलक्ष्मी यांच्यासमवेत महापालिकेत बैठक घेतली.
शहरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी रस्ते व चौक अतिक्रमणमुक्त करण्याचे, सीसीटीव्ही यंत्रणा सक्षम करण्याचे, महापालिकेच्या शाळांना सीएसआर फंडातून मदत मिळवण्याचे, पीएम ई बस योजनेअंतर्गत आणखी बसेस आणण्याचे, झोपडपट्टी धारकांना घरकुल मंजुरीसाठी प्रयत्न करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
तसेच भटक्या जनावरांसाठी जागा व निवारा उभारणे, घनकचरा व्यवस्थापन सुधारणा, हेरिटेज इमारती व बगीच्यांच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. दर महिन्याला कामांचा निपटारा करण्यासाठी आढावा बैठक घेण्याचे निर्देशही महाडिक यांनी दिले.
कोल्हापूर शहरातील प्रलंबित प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी आमदार अमल महाडिक यांच्या सूचना
|