विशेष बातम्या
आमदार अमल महाडिक यांची विक्रमनगर येथील जळीतग्रस्तांना भेट
By nisha patil - 8/16/2025 5:58:47 PM
Share This News:
आमदार अमल महाडिक यांची विक्रमनगर येथील जळीतग्रस्तांना भेट
त्वरित मदतीसह कुटुंबाला दिला आधार
कोल्हापूर : विक्रमनगर येथील सिद्धेश्वर शाळेजवळ राहणाऱ्या अभिजीत हनुमंत बनसोडे व शिवाजी हनुमंत बनसोडे यांच्या घरातील गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन दुपारी बाराच्या सुमारास मोठी आग लागली. या घटनेत संपूर्ण प्रापंचिक साहित्य जळून खाक झाले असून बनसोडे कुटुंबाचे मोठे नुकसान झाले आहे.
घटनेची माहिती मिळताच आमदार अमल महाडिक यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन बनसोडे कुटुंबाला धीर दिला. त्यांनी जळीतग्रस्त घराची पाहणी केली व त्वरित मदत म्हणून दोन महिने पुरेल इतके रेशन, अंथरूण कपडे आणि रोख रक्कम देऊ केली.
ही मदत आमदार महाडिक यांच्या संपर्क कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून थेट कुटुंबाकडे सुपूर्द करण्यात आली. तातडीच्या या मदतीमुळे बनसोडे कुटुंबाला दिलासा मिळाला असून परिसरातील नागरिकांनी आमदार महाडिक यांच्या तत्परतेचे कौतुक केले आहे.
आमदार अमल महाडिक यांची विक्रमनगर येथील जळीतग्रस्तांना भेट
|