बातम्या
दऱ्याचे वडगाव इथल्या आपत्तीग्रस्तांना आमदार अमल महाडिक यांचा मदतीचा हात; स्वनिधीतून दिली मदत
By Administrator - 3/21/2026 4:31:58 PM
Share This News:
दऱ्याचे वडगाव इथल्या आपत्तीग्रस्तांना आमदार अमल महाडिक यांचा मदतीचा हात; स्वनिधीतून दिली मदत
दोन दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे कोल्हापुरातील दऱ्याचे वडगाव इथल्या अनेक घरांचे मोठे नुकसान झाले होते. वादळी वाऱ्यामुळे घरावरील पत्रे उडून गेल्यामुळे अनेकांचे संसार उघड्यावर पडले होते. आमदार अमल महाडिक यांना याची माहिती मिळताच त्यांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली आणि नुकसानीचे पंचनामे तातडीने करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले होते.
नुकसान झालेल्या बऱ्याच शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती नाजूक असल्यामुळे आमदार अमल महाडिक यांनी स्वखर्चातून नुकसान रस्तांना मदत करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार गुरुवारी आमदार अमल महाडिक यांनी सिमेंटचे पत्रे पाठवून दिले. ऐन सणासुदीच्या पार्श्वभूमीवर अस्मानी संकटाला तोंड देणाऱ्या ग्रामस्थांना या मदतीमुळे दिलासा मिळाला आहे.दऱ्याचे वडगाव येथे गावातील प्रमुख मंडळींच्या उपस्थितीत नुकसानग्रस्त ग्रामस्थांना या पत्र्यांचे वाटप करण्यात आले.
दऱ्याचे वडगाव इथल्या आपत्तीग्रस्तांना आमदार अमल महाडिक यांचा मदतीचा हात; स्वनिधीतून दिली मदत
|