बातम्या

पेठ वडगावात आमदार चषक महायुती दहीहंडी उत्सव भव्यदिव्य सोहळ्यात संपन्न

MLA Cup Mahayuti Dahi Handi festival


By nisha patil - 8/21/2025 2:42:02 PM
Share This News:



पेठ वडगावात आमदार चषक महायुती दहीहंडी उत्सव भव्यदिव्य सोहळ्यात संपन्न

शिरोळचे जय महाराष्ट्र पथक विजयी; ₹2.51 लाखांचे मानकरीपद पटकावले

नगरपालिका चौकात आमदार दलितमित्र डॉ. अशोकराव माने (बापू) प्रेमी आयोजित आमदार चषक महायुती दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात व भव्यदिव्य वातावरणात संपन्न झाला. परंपरा, उत्साह आणि तरुणाईचा जल्लोष यांचा संगम घडवणारा हा सोहळा पेठ वडगावच्या इतिहासात एक अविस्मरणीय पर्व ठरला.

या सोहळ्यास हातकणंगले मतदारसंघाचे आमदार डॉ. माने (बापू), समित दादा कदम, माजी आमदार सुरेश हाळवणकर, विजयसिंह माने, अरुण इंगवले, मोहनलाल माळी, अमरसिह पाटील, अजय थोरात, संदीप कारंडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. त्यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनामुळे वातावरणात उत्साहाची नवचेतना निर्माण झाली.

उत्सवात मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री तेजा देवकर, तेजल शिंदे, रिलस्टार प्रतीक्षा सूर्यवंशी, कार्टून आन्या, सिद्धू व रवी दाजी यांच्यासह अनेक कलाकारांनी हजेरी लावून सोहळ्याची शोभा वाढवली.

गोविंदा पथकांच्या थरारक सादरीकरणात शिरोळचे जय महाराष्ट्र गोविंदा पथक विजयी ठरले. या पथकाने तब्बल ₹2,51,000/- चे मानकरीपद पटकावत विजयाचा बहारदार मान मिळवला.
“दहीहंडी फोडणे म्हणजे फक्त माखनहंडी नव्हे; तरुणाईला दिशा देणे व ऐक्याची ताकद दाखवणे हा खरा संदेश आहे,” असे आमदार माने (बापू) यांनी सांगितले.


पेठ वडगावात आमदार चषक महायुती दहीहंडी उत्सव भव्यदिव्य सोहळ्यात संपन्न
Total Views: 93