विशेष बातम्या
आमदार डॉ. राहुल आवाडे यांच्या हस्ते बोअर व व्यायामशाळेचे उद्घाटन
By nisha patil - 8/16/2025 2:54:49 PM
Share This News:
आमदार डॉ. राहुल आवाडे यांच्या हस्ते बोअर व व्यायामशाळेचे उद्घाटन
स्थानिकांच्या मागणीनुसार उभारण्यात आलेल्या नवीन बोअर व व्यायामशाळेचे उद्घाटन आमदार डॉ. राहुल आवाडे यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.
या प्रसंगी आमदार डॉ. आवाडे म्हणाले, “तरुण पिढी शारीरिक, मानसिक आणि सामाजिकदृष्ट्या सक्षम झाली तर गाव व समाज प्रगतीपथावर जातो. व्यायामशाळेमुळे युवकांमध्ये तंदुरुस्तीची जाणीव निर्माण होईल, तर बोअरमुळे परिसरातील पाणीटंचाईच्या समस्येला दिलासा मिळेल.”
स्थानिक नागरिक व कार्यकर्त्यांनी या उपक्रमाचे स्वागत करून आमदार आवाडे यांचे मनःपूर्वक आभार मानले. गावातील महिला, तरुणाई आणि ज्येष्ठ नागरिकांच्या मोठ्या उपस्थितीत कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
आमदार डॉ. राहुल आवाडे यांच्या हस्ते बोअर व व्यायामशाळेचे उद्घाटन
|