बातम्या

नवरात्रात भाविकांसाठी आमदार डॉ. राहुल आवाडे यांचा सेवाभावी उपक्रम..

MLA Dr Rahul Awades charitable initiative for devotees during Navratri


By nisha patil - 1/10/2025 3:33:38 PM
Share This News:



 नवरात्रात भाविकांसाठी आमदार डॉ. राहुल आवाडे यांचा सेवाभावी उपक्रम..

कोल्हापूर : नवरात्र उत्सवात दरवर्षी कोल्हापूर अंबाबाईच्या दर्शनासाठी हजारो भाविक भक्त पायी व विविध मार्गाने दर्शनासाठी येतात. यामध्ये उपवासाच्या काळात भाविकांना कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी आमदार डॉ. राहुल आवाडे यांनी पुढाकार घेतला.

भक्तांच्या हातात फ्रुट बॅग देण्याची व्यवस्था करण्यात आली. या फ्रुट बॅगमध्ये उपवासात लागणारी ताजी फळे तसेच पिण्याचे पाणी उपलब्ध करून दिले होते. भक्तांचा प्रवास सुखकर व्हावा आणि त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे स्मित हास्य यावे, हा या उपक्रमामागचा उद्देश होता.

आमदार डॉ. राहुल आवाडे यांच्या या सेवाकार्यामुळे अनेक भाविक आनंदित झाले. “भक्तांच्या पाठीशी उभे राहणे हीच खरी सेवा आहे” असा संदेश या माध्यमातून देण्यात आला.


नवरात्रात भाविकांसाठी आमदार डॉ. राहुल आवाडे यांचा सेवाभावी उपक्रम..
Total Views: 59