राजकीय

कोल्हापूर महापालिकेच्या डांबर प्लांटला आमदार क्षीरसागर यांची अचानक भेट...

MLA Kshirsagar makes a surprise visit to Kolhapur Municipal Corporation


By nisha patil - 5/12/2025 12:28:28 PM
Share This News:



कोल्हापूर -: शहरातील रस्त्यांची सुधारणा आणि दुरुस्ती कामांचा केलेला वेग तपासण्यासाठी महानगरपालिकेच्या वतीने सुरु असलेल्या डांबर प्लांटला आज अचानक भेट देऊन पाहणी करण्यात आली. भाडे तत्वावर चालू असलेला हा डांबरीकरण प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यरत आहे की नाही, याची सखोल तपासणी अधिकाऱ्यांनी केली.

शहरातील रस्ते डांबरीकरणाच्या कामांना तातडीने गती देण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या. रस्त्यांची सर्व कामे 31 डिसेंबरपूर्वी पूर्ण करून शहरातील सर्व रस्ते सुस्थितीत करावेत, असा कठोर आदेश देण्यात आला. रस्त्यांच्या कामात कोणतीही ढिलाई चालणार नसून तक्रारी आल्यास थेट जबाबदारी संबंधितांवर निश्चित केली जाईल, असा स्पष्ट इशारा यावेळी देण्यात आला.

तसेच शहरातील वाहतुकीच्या वाढत्या समस्यांबाबत व अन्य पूरक बाबींवरही अधिकाऱ्यांशी चर्चा झाली. डांबर प्रकल्पाच्या माध्यमातून रस्ते विकासासाठी लागणारे साहित्य पुरेसं आणि दर्जेदार उपलब्ध व्हावं, यासाठीही विशेष निर्देश देण्यात आले.

या अचानक पाहणीदरम्यान अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, शहर अभियंता रमेश मस्कर, शिवसेना उपजिल्हाप्रमुख रमेश खाडे, उपशहर अभियंता उल्हास पवार, महादेव फुलारी, गुजर तसेच ठेकेदार उपस्थित होते


कोल्हापूर महापालिकेच्या डांबर प्लांटला आमदार क्षीरसागर यांची अचानक भेट...
Total Views: 20