विशेष बातम्या
नांदणी मठाची अस्मिता परत आणण्यासाठी आमदार माने प्रयत्नशील
By nisha patil - 1/8/2025 10:03:34 PM
Share This News:
नांदणी मठाची अस्मिता परत आणण्यासाठी आमदार माने प्रयत्नशील
महादेवी हत्तीणीच्या न्यायासाठी शासनस्तरावर लढण्याचा आमदार माने यांचा निर्धार
शिरोळ – हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे आमदार व दलितमित्र डॉ. अशोकराव माने (बापू) यांनी नांदणी येथील श्री जिनसेन भट्टारक जैन मठाला भेट देऊन धर्मगुरु स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामीजी महाराज यांच्याशी चर्चा केली. या भेटीत महादेवी उर्फ माधुरी हत्तीणीला नांदणी मठाकडे परत आणण्यासंदर्भात सविस्तर चर्चा झाली.
आ. माने यांनी शासन व न्यायालयीन स्तरावर पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले असून, महादेवी ही केवळ जैन धर्मीयांची नव्हे तर संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र आणि कर्नाटकातील जनतेच्या श्रद्धेचा विषय आहे, असे ते म्हणाले. सर्वपक्षीय नेत्यांना एकत्र घेऊन या लढाईसाठी कटिबद्ध असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी स्वाभिमानी संघटनेचे सागर शंभूशेट्टे, सदाशिव बन्ने, सागर कोळी, सुरेश रेडेकर, पै. बाळू खोंद्रे, नितीन बागे, महेश परीट यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
नांदणी मठाची अस्मिता परत आणण्यासाठी आमदार माने प्रयत्नशील
|