बातम्या
इचलकरंजीतील वाचनालयासाठी आमदार राहुल आवाडे यांची २२ कोटींच्या निधीसाठी मागणी
By nisha patil - 5/31/2025 3:27:57 PM
Share This News:
इचलकरंजीतील वाचनालयासाठी आमदार राहुल आवाडे यांची २२ कोटींच्या निधीसाठी मागणी
सहपालकमंत्री मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली कोल्हापूर व इचलकरंजी विकासकामांचा आढावा
कोल्हापूर जिल्ह्याच्या सहपालकमंत्री माधुरीताई मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात कोल्हापूर आणि इचलकरंजी महानगरपालिकेच्या विकासकामांचा आढावा घेण्यासाठी बैठक पार पडली.
या बैठकीत चालू, प्रस्तावित आणि अन्य विकासकामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
इचलकरंजीचे आमदार डॉ. राहुल आवाडे यांनी रवींद्रनाथ टागोर वाचनालयासाठी २२ कोटी रुपयांच्या निधीस लवकरात लवकर मान्यता देण्याची मागणी केली.
या वेळी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, जिल्हाधिकारी अमोल येडगे, पोलीस अधीक्षक योगेश कुमार, जिल्हा परिषद सीईओ एस. कार्तिकेयन, आयुक्त पल्लवी पाटील व निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली उपस्थित होते.
इचलकरंजीतील वाचनालयासाठी आमदार राहुल आवाडे यांची २२ कोटींच्या निधीसाठी मागणी
|