राजकीय
आमदार राजेंद्र पाटील यड्रावकरानी घेतला 9 तारखेचा धसका
By nisha patil - 8/8/2026 3:19:43 PM
Share This News:
आमदार राजेंद्र पाटील यड्रावकरानी घेतला 9 तारखेचा धसका
सैनिक टाकळी येथील माजी सैनिक हॉलमध्ये नऊ ऑगस्ट च्या मोर्चाच्या नियोजनाची बैठक घेण्यात आली. यावेळी बैठकीला सैनिक टाकळी अकिवाट खिद्रापूर येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आमदारांनी एमआयडीसी रद्दच्या आंदोलनाविरोधात वातावरण तयार करण्यासाठी
पैश्याचा आणि पत्रकाचा पाऊस सुरू केला आहे गावागावात गट तट तयार करून झुंबड लावायची आणि स्वतःची पोळी भाजण्याचा केविलवाना प्रयत्न सुरू केला आहे.
सैनिक टाकळी प्रस्तावित एमआयडीसीचा लढा 2023 पासून सुरू आहे त्यामध्ये सैनिक टाकळीच्या पंचक्रोशीला आवश्यक असणारा विकास झाला पाहिजे परंतु त्या ठिकाणची शेती -माती ,आरोग्य, परंपरा जपली पाहिजे आणि एमआयडीसी रद्द झाली पाहिजे यासाठी केली दोन महिन्यापासून आंदोलन सुरू आहे .
पण प्रशासनांकडुन व शिरोळ तालुक्याचे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी हे आंदोलन मोडीत काढायचं म्हणून वेगवेगळ्या पद्धतीने षडयंत्र सुरू केलेल आहे .
पण त्या आमदारांना माहित नाही की सैनिक टाकळी मध्ये शत्रूला धूळ चालणारा सैनिक राहतो तो त्याच्या गावावर आणि पंचक्रोशीवर आलेल संकट उधळून लावण्यासाठी जीवाची बाजी लावायला सुद्धा मागे पुढे बघणार नाही हे आमदारांनी ध्यानात ठेवावं .
जोपर्यंत एमआयडीसी रद्दचा निर्णय होत नाही तो पर्यंत हे आंदोलन थांबणार नाही. ठरल्याप्रमाणे 9ऑगस्ट क्रांतिदिनी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या कार्यालयावर मोर्चा निघणार .
सैनिक टाकळी पंचक्रोशीतील अकिवाट खिद्रापूर राजापूर राजापूर वाडी दानवाड टाकळीवाडी या गावातून मोठ्या प्रमाणात माजी सैनिक शेतकरी पूरग्रस्त नागरिक सामील होणार. तसेच आंदोलनामध्ये तालुक्यातील सर्व समविचारी पक्ष संघटना सामील होणार.
जय जवान!जय किसान!
आमदार राजेंद्र पाटील यड्रावकरानी घेतला 9 तारखेचा धसका
|