राजकीय
आध्यात्मिक वातावरणात आमदार राजेश क्षीरसागर यांचा वाढदिवस साजरा; शुभेच्छांसाठी शिवालयावर मान्यवरांसह कार्यकर्त्यांची रीघ
By nisha patil - 11/25/2025 11:22:41 AM
Share This News:
कोल्हापूर दि.२४ : कोल्हापूरचे लोकप्रिय आमदार राजेश क्षीरसागर यांचा वाढदिवस शिवसैनिकांसह मित्रमंडळीसाठी पर्वणी ठरते. या वाढदिवसानिमित्त शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारानुसार हिंदुत्वाची, अद्यात्माची आणि सामाजिक कार्याची किनार देत शिवसैनिकांकडून विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. यंदाचा वाढदिवस आमदार राजेश क्षीरसागर आणि समस्त शिवसैनिकांसाठी दुग्धशर्करा योग ठरला आहे. कालच आमदार राजेश क्षीरसागर यांचे चिरंजीव पुष्कराज यांचा शुभविवाह आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालाची वर्षपूर्ती त्यामुळे वाढदिवसाचा जल्लोष कालपासूनच पहायला मिळत आहे.
आज सकाळी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर देवदर्शन करून शिवालय येथे शुभेच्छा स्वीकारण्यासाठी उपस्थित राहिले. यावेळी जिल्ह्यातील वारकरी संप्रदायाच्यावतीने शिवालय, शनिवार पेठ येथे कीर्तन आणि रिंगण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. टाळ, मृदंगाच्या तालावर बाल वारकऱ्यांनी हरीपाठावर ठेका धरला. या कार्यक्रमात आमदार राजेश क्षीरसागर यांच्यासह देवस्थान समितीच्या माजी कोषाध्यक्षा सौ.वैशाली क्षीरसागर, युवासेना पश्चिम महाराष्ट्र सचिव ऋतुराज क्षीरसागर, सौ.दिशा क्षीरसागर, युवानेते पुष्कराज क्षीरसागर, सौ.पूजा क्षीरसागर, कु.कृष्णराज आणि आदिराज यांच्यासह बालवारकरी तल्लीन झाल्याचे पाहावयास मिळाले. यावेळी सौ.वैशाली क्षीरसागर, सौ.दिशा क्षीरसागर, सौ.पूजा क्षीरसागर यांच्याकडून माऊलींच्या अश्वाची मनोभावे पूजा करण्यात आली. यानंतर रिंगण सोहळा पार पडला. यानंतर उपस्थित वारकरी संप्रदायाने आमदार राजेश क्षीरसागर यांना श्री विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आणि तुळशीमाळा देवून शुभेच्छा दिल्या. यावेळी नंदवाळ दिंडी अध्यक्ष बाळासाहेब पोवार, शामराव कुरुकले, यशवंत कदम, भगवान तिवले, सखाराम चव्हाण, सोपान पाटील, कृष्णात शेळके, संतोष रंगोळे, सुरज मोरे आदी वारकरी संप्रदाय उपस्थित होते.
सायंकाळी शिवालय कार्यालयात शुभेच्छा देण्यासाठी मान्यवरांसह, शिवसैनिक, कार्यकर्ते आणि मित्रमंडळीची रीघ पहायला मिळाली. आमदारकीच्या वर्षपूर्तीच्या शुभेच्छासह वाढदिवसाच्या शुभेच्छाही आमदार राजेश क्षीरसागर यांना देण्यात आल्या. यावेळी सौ.वैशाली क्षीरसागर, सौ.दिशा क्षीरसागर, सौ.पूजा क्षीरसागर यांच्यासह महिला आघाडीच्या वतीने औक्षण ओवाळण्यात आले. यावेळी पालकमंत्री ना.मा.श्री.प्रकाश आबिटकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आमदार राजेश क्षीरसागर यांनी केक कापून वाढदिवस साजरा केला. यानंतर मान्यवरांच्या शुभेच्छा स्वीकारल्या.
यावेळी बोलताना राजेश क्षीरसागर यांनी, कोल्हापूरच्या जनतेने, शिवसैनिकांनी गतवर्षी मला निवडणुकीत विजयी करून अनमोल भेट दिली आहे. ही भेट आयुष्यभर माझ्या स्मरणात राहील. कोल्हापूरवासीयांनी दाखविलेल्या प्रेमाचे ऋण कामाच्या माध्यमातून फेडण्यासाठी मी तत्पर असेन. येणाऱ्या काळात कोल्हापूरच्या सर्वांगीण विकासाचे ध्येय घेवून कार्यरत राहणार असल्याची ग्वाही दिली.
क्षीरसागर यांच्या वाढदिवसाला सामाजिक कार्याची किनार
वाढदिवसाचे औचित्य साधून शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिकांच्यावतीने विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. आज शिवसेना राजारामपुरी विभागाच्या वतीने पांजरपोळ येथे गोमातेचे पूजन करून गाईना डाळ, गुळ, चारा वाटप करण्यात आले. यावेळी मंदार तपकीरे, दुर्गेश लिंग्रज, कमलाकर जगदाळे, अश्विन शेळके, दादू शिंदे, आदी प्रमुख कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. यानंतर शिवसेना शुक्रवार पेठ व उत्तरेश्वर पेठ यांच्या वतीने कोल्हापूर थाळी, सीपीआर चौक येथे मोफत अन्नदान करण्यात आले. यावेळी उपजिल्हाप्रमुख किशोर घाटगे, उपशहरप्रमुख सनी अतिग्रे, राकेश पोवार, निलेश हंकारे, अनंत पाटील, सुरज धनवडे, उदय प्रभावळे उपस्थित होते. यासह शिवसेना विभाग मंगळवार पेठ यांचेकडून मंगळवार पेठ येथील बालसंकुलास धान्यवाटप करण्यात आले. यावेळी शिवसेना जिल्हा संघटक विनायक साळोखे, उपजिल्हाप्रमुख रणजीत मंडलिक, शहरसंघटक हर्षल सुर्वे, आशिष पोवार, रमेश पुरेकर, अंकुश निपाणीकर, देवेंद्र खराडे, किरण अतिग्रे आदी उपस्थित होते. यासह येणाऱ्या दोन तीन दिवसात अशाच पद्धतीने सामाजिक उपक्रमांचे विविध विभागांच्या वतीने आयोजन करण्यात येणार आहे.
आमदार राजेश क्षीरसागर यांच्यावर विविध स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव
राज्याचे मुख्यमंत्री नाम.मा.श्री. देवेंद्र फडणवीस, शिवसेना मुख्यनेते, राज्याचे उप मुख्यमंत्री ना.मा.श्री.एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री ना.मा.श्री.अजितदादा पवार, खासदार छत्रपती शाहू महाराज, विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलमताई गोऱ्हे, युवा सेना अध्यक्ष खासदार श्री.श्रीकांत शिंदे, ना.मा.चंद्रकांतदादा पाटील, ना.मा.उदय सामंत, ना.मा.गुलाबराव पाटील, ना.मा.दादाजी भुसे, ना.मा., ना.मा.शंभूराजे देसाई, ना.मा.श्री.हसन मुश्रीफ, मा.ना.श्री.संजय राठोड, मा.ना.श्री.संजय शिरसाट, मा.ना.श्री.प्रताप सरनाईक, सहपालकमंत्री ना.मा.माधुरी मिसाळ, राज्यमंत्री ना.मा.श्री.योगेश कदम, माजी खासदार संभाजीराजे छत्रपती, माजी आमदार मालोजीराजे छत्रपती, खासदार धैर्यशील माने, खासदार धनंजय महाडिक, माजी खासदार संजय मंडलिक, आमदार चंद्रदीप नरके, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, आमदार शिवाजीराव पाटील, आमदार अमल महाडिक, यांच्यासह विविध लोकप्रतिनिधी व मान्यवरांनी दूरध्वनीद्वारे शुभेच्छा दिल्या. शिवसेना उपनेत्या माजी आमदार श्रीमती जयश्री जाधव, जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, महानगरप्रमुख शिवाजी जाधव, माजी महापौर महादेवराव आडगुळे, माजी महापौर आर.के.पोवार, माजी स्थायी समिती सभापती शारंगधर देशमुख, माजी नगरसेवक आदिल फरास, भाजप जिल्हाध्यक्ष विजय जाधव, शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमुख शुभांगी साळोखे, शहरप्रमुख पवित्रा रांगणेकर, माजी नगरसेवक नंदकुमार मोरे, संभाजी देवणे, अजित मोरे, अभिजित चव्हाण, आश्पाक आजरेकर, अभिजित खतकर, अजित इंगवले, नेपोलियन सोनुले, चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे व संघटनेचे पदाधिकारी यांनी प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा दिल्या.
आध्यात्मिक वातावरणात आमदार राजेश क्षीरसागर यांचा वाढदिवस साजरा; शुभेच्छांसाठी शिवालयावर मान्यवरांसह कार्यकर्त्यांची रीघ
|