राजकीय
आमदार राजेश क्षीरसागर "ऑन फिल्ड"; शहरात सुरु असणाऱ्या रस्त्यांच्या कामाची पाहणी
By nisha patil - 4/11/2025 12:10:27 PM
Share This News:
कोल्हापूर दि.०४ : दर्जाहीन कामामुळे शहरातील रस्ते खड्डेमय बनले असून, रस्त्यांची परिस्थिती भीषण आहे. रस्त्यांमुळे अपघात होऊन नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. वाहनचालकांना मणक्याचे आणि कंबरेचे दुखणे उद्भवत आहेत. हा सगळा कारभार सुधारण्यासाठी आणि शहरातील रस्ते दर्जेदार आणि सुस्थितीत आणणायासाठी आमदार राजेश क्षीरसागर "ऑन फिल्ड" उतरले आहेत. शहरातील नागाळा पार्क येथे सुरु असणाऱ्या रस्त्यांच्या कामाच्या ठिकाणी आमदार राजेश क्षीरसागर यांनी अचानक भेट देवून कामाची पाहणी केली. यावेळी रस्त्यांचा दर्जा, गुणवत्ता योग्य ठेवण्याच्या सूचना आमदार राजेश क्षीरसागर यांनी संबधित ठेकेदारास दिल्या.
यावेळी बोलताना आमदार राजेश क्षीरसागर यांनी, कोल्हापूर शहरातील रस्ते चांगले आणि सुस्थितीत असावे तसेच नागरिकांना कसलाही त्रास होऊ नये, यासाठी वारंवार मनापा प्रशासना सोबत बैठका घेऊन सूचना देण्यात आल्या आहेत. दर्जेदार रस्ते करण्याची जबाबदारी ठेकेदाराची असून, त्यावर महानगरपालिकेचा अंकुश असणे आवश्यकच आहे. यामध्ये कोणतीही कसर न राहता कोल्हापूर शहर खड्डेमुक्त करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. महानगरपालिकेची आर्थिक स्थिती पाहता निधीची अत्यंत कमतरता असल्याचे जाणवले.
त्यामुळे राज्य शासनाचा विशेष निधी, जिल्हा नियोजन समिती निधी आणि आमदार फंडातून आवश्यक निधी देण्यात येत आहे. निधी देत असताना विकास कामांचा दर्जा योग्य असावा. नागरिकांकडून कोणतीही तक्रार येता कामा नये. यासाठी आम्ही प्रयत्नशील आहे. रस्त्यांच्या गुणवत्तेबाबत ठेकेदार आणि संबधित अधिकारी यांच्यावरही जबाबदारी निश्चिती करण्यात आली आहे. रस्त्यांचा दर्जा योग्यच असावा, ही आग्रही भूमिका आहे. येत्या काळात शहर खड्डेमुक्त करून नागरिकांना दर्जेदार, टिकावू आणि गुणवत्तापूर्ण रस्ते देण्यास कटिबद्ध असल्याचे सांगितले.
दरम्यान आमदार राजेश क्षीरसागर यांच्या "ऑन फिल्ड" कामाची चर्चा शहरवासीयांमध्ये रंगली असून, रस्त्यांच्या दर्जेदार कामासाठी आमदार राजेश क्षीरसागर यांनी घेतलेल्या भूमिकेवर समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
आमदार राजेश क्षीरसागर "ऑन फिल्ड"; शहरात सुरु असणाऱ्या रस्त्यांच्या कामाची पाहणी
|