बातम्या

*चंदगड विधानसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी मुख्यमंत्र्यांची विधानभवनात आम. शिवाजी पाटील यांनी घेतली सदिच्छा भेट

MLA Shivaji Patil paid a courtesy visit to the Chief Minister


By Administrator - 4/7/2026 7:23:50 PM
Share This News:



*चंदगड विधानसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी मुख्यमंत्र्यांची विधानभवनात आम. शिवाजी पाटील यांनी घेतली सदिच्छा भेट
 

आजरा(हसन तकीलदार):- आजरा-चंदगड विधान सभा मतदार संघांचे आमदार शिवाजी पाटील यांनी लोकांभिमुख कार्याला सुरवात केली आहे. हेऱ्याची सरंजामशाही संपुष्टात आणून कष्टकरी रयतेच्या नावावर जमिनी करून देण्याचा मोठा निर्णय महसूल खात्याला घ्यायला भाग पाडून हेरे गावच्या बळीराजाला न्याय मिळवून दिला. हे त्यांचे ऐतिहासिक कार्य आहे. त्याचप्रमाणे नेसरी येथे उर्दू शाळेला 11वी व 12वी पर्यंतच्या वर्गाना मंजुरी मिळवून देऊन आपल्या कामाची झलक त्यांनी दाखवलेली आहे.अशाच पद्धतीच्या कामांचा आढावा घेऊन ते विधानभवनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.   
     

विधानभवन येथे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन चंदगड विधानसभा मतदारसंघातील विविध प्रलंबित विकासकामांच्या संदर्भात सविस्तर चर्चा त्यांनी केली.
यावेळी मतदारसंघातील रस्ते, पूल, सिंचन, पिण्याच्या पाण्याच्या योजना, शिक्षण, आरोग्य, पर्यटन, कृषी, वनक्षेत्रातील पायाभूत सुविधा तसेच विविध विभागांशी संबंधित प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची विनंती मुख्यमंत्री महोदयांकडे केली असल्याचे सांगितले.

 

चंदगड विधानसभा मतदारसंघाचा सर्वांगीण आणि संतुलित विकास व्हावा, ग्रामीण भागातील नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात आणि विकासकामांना आवश्यक निधी व प्रशासकीय मान्यता तातडीने मिळावी, याबाबत मुख्यमंत्री महोदयांनी सकारात्मक प्रतिसाद देत संबंधित विषयांवर आवश्यक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले असल्याचेही सांगण्यात येत आहे.
 

मतदारसंघातील प्रत्येक गावाचा विकास, शेतकरी, युवक, महिला, विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या हिताचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी आपला सातत्यपूर्ण पाठपुरावा यापुढेही कायम राहील. जनतेने आपल्यावर दाखविलेल्या विश्वासाला न्याय देण्यासाठी विकासाची गती अधिक वाढविण्याचा  निर्धार आहे असे त्यांनी यावेळी सांगितले.


*चंदगड विधानसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी मुख्यमंत्र्यांची विधानभवनात आम. शिवाजी पाटील यांनी घेतली सदिच्छा भेट
Total Views: 5