विशेष बातम्या
आमदार शिवाजराव पाटील यांचे हस्ते आजऱ्यात पदाधिकारी निवड पत्रे वाटप
By nisha patil - 10/20/2025 12:37:37 PM
Share This News:
आमदार शिवाजराव पाटील यांचे हस्ते आजऱ्यात पदाधिकारी निवड पत्रे वाटप
आजरा (हसन तकीलदार ):- भारतीय जनता पार्टी आजरा कार्यकारणीच्या पद वाटपासाठी उपस्थित शिवाजीराव (भाऊ) पाटील यांच्या हस्ते कार्यकारणीची पदे वाटप करण्यात आली.
यामध्ये आजरा शहराध्यक्ष पदी आकाश रावसाहेब पाटील व महिला शहराध्यक्ष पदी माधवी पाचवडेकर यांना निवडीचे पत्र देण्यात आली. याचबरोबर इतर कमिट्यांचे देखील पदे शिवाजीराव पाटील व भाजपा आजरा तालुका अध्यक्ष अनिकेत चराटी यांच्या हस्ते देण्यात आली.यावेळी आमदार शिवाजराव पाटील यांनी तालुक्यातील कामकाजाचा आढावा घेत पक्षवाढीसाठी प्रयत्न करण्याबाबत सूचना दिल्या. त्याचप्रमाणे उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल कांबळे यांनी केले प्रस्ताविक व स्वागत अनिकेत चराटी यांनी केले, आभार जयवंत सुतार यांनी मानले या कार्यक्रमासाठी आजराच्या माजी नगराध्यक्ष जोस्ना चराटी, संयोगिता बापट, शामली वाघ, जयवंत सुतार, आनंदा कुंभार, सुधीर(बापू) कुंभार, अनिल पाटील, सी. आर. देसाई, लहू वाकर, शैलेश पाटील, नाथा देसाई, अभिजीत रांगणेकर, दीपक गवळी आदिसह कार्यकर्ते उपस्थित होते.
आमदार शिवाजराव पाटील यांचे हस्ते आजऱ्यात पदाधिकारी निवड पत्रे वाटप
|