बातम्या

आमदार यड्रावकर यांची पूरग्रस्त भागाची पाहणी; प्रशासनाला दिल्या तातडीच्या सूचना

MLA Yadravkar inspects flood


By nisha patil - 8/21/2025 4:10:55 PM
Share This News:



आमदार यड्रावकर यांची पूरग्रस्त भागाची पाहणी; प्रशासनाला दिल्या तातडीच्या सूचना

 पूरस्थितीत स्थलांतर व मदतकार्य सुरू;  सूचनांचे पालन करण्याचे आवाहन

सततच्या मुसळधार पावसामुळे कृष्णा व पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत वाढ होऊन औरवाड, कुरुंदवाड (गोठणपूर) व शिकलगार वसाहत परिसरात पूरस्थिती निर्माण झाली आहे. या भागाची आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी प्रत्यक्ष पाहणी करून प्रशासनाला आवश्यक त्या सूचना दिल्या.

पूरग्रस्तांच्या सुरक्षेसाठी स्थलांतर प्रक्रिया सुरू करण्यात आली असून प्रशासनाच्या वतीने चहा, नाश्ता व जेवणाची सोय करण्यात आली आहे. तसेच जनावरांचेही सुरक्षित स्थळी स्थलांतर करून त्यांच्यासाठी चाऱ्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

आमदार यड्रावकर यांनी सांगितले की, “सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे, मात्र सतर्क राहणे गरजेचे आहे. नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे व गरज नसताना घराबाहेर पडू नये.”

त्यांनी पुढे सांगितले की, “पूरग्रस्त बांधवांना दिलासा देणे आणि आवश्यक सोयी उपलब्ध करून देणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. प्रशासन, कार्यकर्ते व स्वयंसेवक यांच्या सहकार्याने मदतकार्य अखंड सुरू आहे.”

नागरिकांनी धीर राखावा व सुरक्षित राहावे, असे आवाहनही आमदारांनी केले आहे.


आमदार यड्रावकर यांची पूरग्रस्त भागाची पाहणी; प्रशासनाला दिल्या तातडीच्या सूचना
Total Views: 116