बातम्या
सांगली नाक्यावरील कचरा डेपोबाबत आमदार यड्रावकरांचा सवाल...
By nisha patil - 3/6/2025 6:22:36 PM
Share This News:
सांगली नाक्यावरील कचरा डेपोबाबत आमदार यड्रावकरांचा सवाल...
यड्रावमध्ये जनावरे राहतात का?"यड्रावकरांचा सवाल
इचलकरंजीजवळील सांगली नाक्यावरील कचरा डेपोचा त्रास सहन करणाऱ्या नागरिकांच्या तक्रारींवरून आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी महापालिकेत थेट आवाज उठवला. सोमवारी महापालिकेत आयुक्त पल्लवी पाटील यांच्या दालनात झालेल्या विशेष बैठकीत त्यांनी, "इचलकरंजीमध्ये माणसे राहतात, मग यड्रावमध्ये जनावरे राहतात का?" असा तीव्र प्रश्न उपस्थित केला.कचरा डेपोच्या ठिकाणी इचलकरंजीकडील बाजूस ४० फूट उंच भिंत असून यड्रावच्या बाजूस केवळ १० फूट उंची आहे, ही असमतोल व्यवस्था का आहे, असा सवाल करत यड्रावकर यांनी प्रशासनाची चांगलीच कानउघाडणी केली. यावेळी उपायुक्त नंदू परळकर यांनी आठ दिवसात पत्रे लावून भिंतीची उंची वाढवण्याचे आश्वासन दिले.
सांगली नाक्यावरील कचरा डेपोबाबत आमदार यड्रावकरांचा सवाल...
|