बातम्या
पालकमत्र्यांच्या उपस्थितीत रविवारी रात्री रंगणार GPL स्पर्धेचा अंतिम महामुकाबला
By nisha patil - 4/19/2026 12:26:53 AM
Share This News:
पालकमत्र्यांच्या उपस्थितीत रविवारी रात्री रंगणार GPL स्पर्धेचा अंतिम महामुकाबला :
अंतिम सामन्याकडे क्रिकेट प्रेमींचे लक्ष
गारगोटी प्रतिनीधी :- भुदरगड तालुक्यातील क्रिकेट प्रेमींसांठी गेल्या 17 वर्षापासून श्री.मौनी विद्यापीठाच्या क्रिडांगणावर सूरु असलेल्या गारगोटी प्रिमीअर लिग (GPL) स्पर्धेला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला आहे. दिवस-रात्र सुरु असलेल्या या स्पर्धेत 21 संघांनी सहभाग नोंदवला असून रविवार दि:19 एप्रिल रोजी रात्री 8 वाजता राज्याचे आरोग्यमंत्री तथा कोल्हापूर जिल्हयाचे पालकमंत्री नामदार प्रकाश आनंदराव आबिटकर यांचेसह विविध मान्यवरांचे उपस्थितीत अंतिम महामुकाबला होणार असून या सामन्याकडे हजारो क्रिकेट प्रेमींचे लक्ष लागून राहिले आहे.
GPL स्पर्धेच्या नियोजनाप्रमाणे सामने पार पडले असून क्रिकेट प्रेमींच्या उस्फुर्त प्रतिसादामुळे गेल्या 15 दिवसापांसून सुरु असलेल्या GPL स्पर्धा यशस्वी होत असलेची माहिती GPL कमिटीचे अध्यक्ष बाजीराव चव्हाण यांनी दिली.
तालुक्यात 17 वर्षांपासून सुरु असलेली क्रिकेट स्पर्धा यावर्षी पहिल्यांदाच दिवस-रात्र सुरु असून अंतिम सामना रात्रीच्या वेळी प्रकाशझोतात खेळवला जात आहे. गारगोटी सारख्या निमशहरी भागात श्री.मौनी विद्यापीठाच्या क्रिडांगणावर होत असलेल्या या सामण्यामुळे नव्या पिढीतील अनेक क्रिकेट खेळाडूंना संधी मिळाली आहे. या स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या संघांची संख्या प्रतिवर्षी वाढत आहे. हे या स्पर्धेचे यश आहे.या स्पर्धेसाठी क्रिडांगणावर आवश्यक अद्ययावत विद्युत यंत्रणा उभारल्यामुळे सामन्यातील आकर्षकता वाढली आहे.
GPL स्पर्धेतील विजेत्या संघांना आकर्षक बक्षिसेदिली जाणार आहेत. अंतिम सामन्यावेळी पालकमंत्री नामदार प्रकाश आबिटकर यांचेसह राजकीय सामाजीक, शैक्षणिक व क्रिडा क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
पालकमत्र्यांच्या उपस्थितीत रविवारी रात्री रंगणार GPL स्पर्धेचा अंतिम महामुकाबला
|