बातम्या

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त कोल्हापूर महानगरपालिकेकडून अभिवादन

MLM Babasaheb Ambedkar jayanti


By nisha patil - 4/14/2026 3:42:14 PM
Share This News:



भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त कोल्हापूर महानगरपालिकेकडून अभिवादन

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, ज्ञानसूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त मंगळवार दि. १४ एप्रिल २०२६ रोजी कोल्हापूर महानगरपालिका यांच्या वतीने महामानवास विनम्र अभिवादन करण्यात आले.

महानगरपालिकेसमोरील डॉ. आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास महापौर मा. सौ. रुपाराणी निकम तसेच नूतन आयुक्त मा. डॉ. राजेंद्र भारुड यांनी पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. यावेळी महापालिकेचे सर्व पदाधिकारी, नगरसेवक आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बाबासाहेबांनी दिलेला समता, बंधुता आणि लोकशाहीचा विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रशासन सदैव कटिबद्ध राहील, असा संकल्प व्यक्त करण्यात आला.

या प्रसंगी उपमहापौर अक्षय जरग, स्थायी समिती सभापती  विशाल शिराळे, विरोधी पक्षनेते राजेश लाटकर, सभागृह नेते मा. मुरलीधर जाधव, महिला व बालकल्याण समिती उप-सभापती  सौ. दिपा ठाणेकर तसेच अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त आणि विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.


भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त कोल्हापूर महानगरपालिकेकडून अभिवादन
Total Views: 17