ताज्या बातम्या

मनसेचे जिल्हा सचिव वैभव माळवे यांचे निधन

MNS District Secretary Vaibhav Malve passes away


By nisha patil - 7/23/2025 10:15:18 PM
Share This News:



मनसेचे जिल्हा सचिव वैभव माळवे यांचे निधन

गडहिंग्लज : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कोल्हापूर जिल्हा ग्रामीण विभागाचे जिल्हा सचिव कु. वैभव माळवे (वय ३२) यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले. वडरगे (ता. गडहिंग्लज) हे त्यांचे मूळ गाव असून, ते पदवीधर होते व अविवाहित होते.

मनसेच्या स्थापनेपासून पक्षात सक्रिय सहभाग असलेल्या वैभव माळवे यांनी विविध आंदोलने व सामाजिक उपक्रमांत सक्रिय योगदान दिले होते. मा. राज ठाकरे साहेबांनी त्यांच्या कार्याची विशेष दखल घेतली होती.

मनमिळावू, शांत स्वभावाच्या वैभव यांच्या निधनाने मनसे परिवारावर शोककळा पसरली आहे. मनसे कोल्हापूर तर्फे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे.


मनसेचे जिल्हा सचिव वैभव माळवे यांचे निधन
Total Views: 295