बातम्या

मनसे दोडामार्ग तालुक्याची साप्ताहिक बैठक उत्साहात; उपसरपंच अमोल परब यांचा सत्कार

MNS Dodamarg Taluka holds enthusiastic weekly meeting


By Administrator - 6/7/2026 1:13:53 PM
Share This News:



मनसे दोडामार्ग तालुक्याची साप्ताहिक बैठक उत्साहात; उपसरपंच अमोल परब यांचा सत्कार

दोडामार्ग :शुभम  गवस महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) दोडामार्ग तालुक्याची साप्ताहिक बैठक हॉटेल सोनचाफा येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. बैठकीत ग्रुप ग्रामपंचायत आडाळी-फोंडयेच्या उपसरपंचपदी निवड झाल्याबद्दल महाराष्ट्र सैनिक अमोल परब यांचा तालुक्याच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांना पुढील राजकीय व सामाजिक वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

बैठकीत दोडामार्ग तालुक्यात पक्षसंघटना अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने विविध गावांमध्ये मनसेच्या शाखा स्थापन करण्याचे नियोजन करण्यात आले. तसेच पक्षाचे नेते शिरीष सावंत यांच्या सूचनेनुसार तालुका निवडणूक पुनर्निरीक्षण कार्यक्रमांतर्गत लवकरात लवकर बी.एल.ओ. नियुक्ती करण्याबाबतही चर्चा करण्यात आली.

या बैठकीस माजी उपजिल्हाध्यक्ष दत्ताराम गावकर, तालुकाध्यक्ष विनायक सावंत, तालुका सचिव संदीप गवस, उपसरपंच अमोल परब, महाराष्ट्र सैनिक नाना देसाई, नवलु झोरे, अक्षय कुबल, महेश जाधव, मधुसूदन खांबल, महेश वरक, मुकुंद परब तसेच अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


मनसे दोडामार्ग तालुक्याची साप्ताहिक बैठक उत्साहात; उपसरपंच अमोल परब यांचा सत्कार
Total Views: 11