विशेष बातम्या
मा. राजसाहेब ठाकरे यांचा वाढदिवस मनसे कोल्हापूर तर्फे विधायक उपक्रमांनी साजरा
By nisha patil - 6/14/2025 10:28:12 PM
Share This News:
मा. राजसाहेब ठाकरे यांचा वाढदिवस मनसे कोल्हापूर तर्फे विधायक उपक्रमांनी साजरा
कोल्हापूर : हिंदू जननायक मा. राजसाहेब ठाकरे यांचा वाढदिवस मनसे कोल्हापूरच्या वतीने सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला. जिल्हाध्यक्ष राजू दिंडोर्ले आणि शहराध्यक्ष प्रसाद पाटील यांच्या नेतृत्वाखाली रुग्णालयांना आवश्यक वैद्यकीय उपकरणे देण्यात आली.
करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी चरणी अभिषेक घालून दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करण्यात आली. तसेच मनसेच्या शहर-जिल्हा मध्यवर्ती जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन सौ. विद्या पाटील यांच्या हस्ते झाले.
पंचगंगा हॉस्पिटल, सावित्रीबाई फुले हॉस्पिटल व सीपीआर रुग्णालयांना सक्शन मशीन, औषध ट्रॉली, फूट स्टूल यांसारखी उपकरणे देण्यात आली.
कार्यक्रमाला मनसेचे विविध पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मा. राजसाहेब ठाकरे यांचा वाढदिवस मनसे कोल्हापूर तर्फे विधायक उपक्रमांनी साजरा
|