राजकीय

मनसेकडून महाराष्ट्रातील पहिली जिल्हा परिषद उमेदवारी जाहीर

MNS announces first Zilla Parishad candidature in Maharashtra


By nisha patil - 1/19/2026 2:02:54 PM
Share This News:



कोल्हापूर :-महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने राज्याच्या राजकारणात नवा इतिहास घडवला आहे. महाराष्ट्रात प्रथमच जिल्हा परिषद निवडणूक लढवण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यातील आकुर्डे जिल्हा परिषद मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
राधानगरी विधानसभा मतदारसंघाचे युवा नेतृत्व युवराज येडूरे यांच्या पत्नी सौ. निविदिता युवराज येडूरे यांना सन्माननीय राज साहेब ठाकरे यांच्या माध्यमातून अधिकृत उमेदवारी देण्यात आली.
या प्रसंगी सौ. निविदिता येडूरे यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. कार्यक्रमावेळी श्रीमती शर्मिला ठाकरे उपस्थित होत्या. त्यांनी सौ. निविदिता येडूरे यांचे अभिनंदन करत त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
मनसेच्या या निर्णयामुळे जिल्हा परिषद राजकारणात नव्या पर्वाची सुरुवात झाली असून स्थानिक पातळीवर मनसे अधिक ताकदीने उभी राहत असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.


मनसेकडून महाराष्ट्रातील पहिली जिल्हा परिषद उमेदवारी जाहीर
Total Views: 41