बातम्या
मनसे उमेदवार डॉ. युवराज येडूरे यांच्या प्रचार दौऱ्याने..पाचवडे–बसरेवाडीत राजकीय वातावरण तापले..
By nisha patil - 2/2/2026 5:26:52 PM
Share This News:
मनसे उमेदवार डॉ. युवराज येडूरे यांच्या प्रचार दौऱ्याने..पाचवडे–बसरेवाडीत राजकीय वातावरण तापले..
पाचवडे व बसरेवाडी परिसरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनाचे अधिकृत उमेदवार डॉ. युवराज येडूरे यांनी प्रचार फेरी काढून पथनाट्याच्या माध्यमातून नागरिकांमध्ये जनजागृती केली. या वेळी त्यांनी शाश्वत विकासाच्या दृष्टीने काम करण्याचे आवाहन करत येत्या निवडणुकीत सात तारखेला अनुक्रमांक दोन असलेल्या रेल्वे इंजिन या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन जनतेला केले.
याप्रसंगी मनसेचे तालुकाध्यक्ष राहुल पाटील यांनी उपस्थित नागरिकांना संबोधित करत सांगितले की, येणाऱ्या काळात साहेबांच्या माध्यमातून तळागाळातील लोकांसाठी, शेतकऱ्यांसाठी विविध योजना सीएसआर निधीअंतर्गत राबविण्यात येणार आहेत.
या योजनांचा लाभ सर्वसामान्य कुटुंबांना मिळणार असून, यासाठी सर्वांनी एकजुटीने साहेबांच्या पाठीशी उभे राहावे, असे आवाहन त्यांनी केले.या प्रचार कार्यक्रमाला परिसरातील मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. प्रचार फेरीदरम्यान नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला.
मनसे उमेदवार डॉ. युवराज येडूरे यांच्या प्रचार दौऱ्याने..पाचवडे–बसरेवाडीत राजकीय वातावरण तापले..
|