बातम्या

यमगे मांडवे गल्लीतील धोकादायक विजेचा खांब तात्काळ हटवण्याची मनसेची मागणी

MNS demands immediate removal


By nisha patil - 12/19/2025 6:16:42 PM
Share This News:



यमगे मांडवे गल्लीतील धोकादायक विजेचा खांब तात्काळ हटवण्याची मनसेची मागणी

 दुर्घटना घडल्यास प्रशासन जबाबदार; मनसेचा ग्रामपंचायतीला इशारा

यमगे गावातील मांडवे गल्लीमध्ये असलेला पूर्णपणे वाकलेला व अत्यंत धोकादायक अवस्थेतील विजेचा खांब तात्काळ हटवून त्याठिकाणी नवीन खांब बसवावा, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना, यमगे यांच्या वतीने ग्रामपंचायत यमगे येथील ग्रामसेवकांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

सदर विजेच्या खांबावरून परिसरातील अनेक घरांच्या सर्विस वायर गेलेल्या असून, हा खांब कोणत्याही क्षणी कोसळून गंभीर जीवितहानी अथवा वित्तहानी होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. याबाबत यापूर्वीही तक्रारी करण्यात आल्या असून, मात्र प्रशासनाकडून दुर्लक्ष झाल्याचा आरोप मनसेकडून करण्यात आला आहे.

या संदर्भात लवकरात लवकर योग्य ती कार्यवाही न झाल्यास आणि भविष्यात कोणतीही दुर्घटना घडल्यास, त्याची संपूर्ण जबाबदारी ग्रामपंचायत प्रशासन व ग्रामसेवकांवर राहील, असा इशाराही मनसेच्या वतीने देण्यात आला आहे.


यमगे मांडवे गल्लीतील धोकादायक विजेचा खांब तात्काळ हटवण्याची मनसेची मागणी
Total Views: 59