राजकीय

निकृष्ट रस्ते कामाविरोधात मनसेचा इशारा

MNS warns against shoddy road work


By nisha patil - 12/5/2026 11:41:42 AM
Share This News:



निकृष्ट रस्ते कामाविरोधात मनसेचा इशारा

 

आज मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत सुरू असलेल्या कुर ते टिक्केवाडी रस्त्याच्या कॉंक्रिटीकरणामध्ये मोठ्या प्रमाणात भेगा पडून भ्रष्टाचार व निकृष्ट कामाचा नमुना समोर आला आहे. जनतेच्या पैशांची उधळपट्टी करणाऱ्या संबंधित ठेकेदार व अधिकाऱ्यांविरोधात आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था, कोल्हापूर यांना आक्रमक पुरावासह निवेदन देण्यात आले.

 

निकृष्ट झालेले संपूर्ण काम तात्काळ तोडून नव्याने दर्जेदार करावे, संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाकावे व जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी मनसे नेते डॉ. युवराज येडुरे यांनी केली आहे.

 

यावेळी मनसे कोल्हापूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष नागेशदादा चौगुले, भुदरगड तालुका अध्यक्ष राहुल पाटील, उपाध्यक्ष विश्वजीत पाटील यांच्यासह भुदरगड तालुक्यातील नागरिक उपस्थित होते.

 

सदर निवेदनाद्वारे महाराष्ट्र नवनिर्माण सेना जनआंदोलन छेडल्याशिवाय राहणार नाही, याचा इशारा यावेळी देण्यात आला.


निकृष्ट रस्ते कामाविरोधात मनसेचा इशारा
Total Views: 19