बातम्या

स्वदेशी अभियानासाठी खासदार धनंजय महाडिक यांचे व्यापाऱ्यांशी संवाद

MP Dhananjay Mahadik interacts


By nisha patil - 9/26/2025 4:40:55 PM
Share This News:



स्वदेशी अभियानासाठी खासदार धनंजय महाडिक यांचे व्यापाऱ्यांशी संवाद

गुलाबफुले व फलक देऊन स्वदेशी वस्तू वापराचे आवाहन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या आत्मनिर्भर भारत – स्वदेशी अभियान संकल्पाच्या प्रचारासाठी खासदार धनंजय महाडिक यांच्या नेतृत्वाखाली भाजप कार्यकर्त्यांनी महाद्वार रोड व जोतिबा रोडवरील व्यापाऱ्यांच्या भेटी घेतल्या.

या भेटीत पी. कुमार, रोहीणी, फ्रेंडशिप, पुष्पम, गोखले ब्रदर्स, अंबा कटपीस सेंटर, करवीर क्रिएशन, कलकत्ता मॅचिंग सेंटर, प्रवासी बॅग आदी व्यापाऱ्यांना गुलाबफुले व मोदींच्या प्रतिमेसह स्वदेशी वापराचे फलक देण्यात आले. व्यापाऱ्यांनीही स्वदेशी वस्तूंचा वापर व विक्री करण्याचा संकल्प व्यक्त केला.

यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष विजय देसाई, महेश जाधव, अशोक देसाई, संगीता खाडे, किरण नकाते, माधुरी नकाते, राहुल चिकोडे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. खासदार महाडिक यांनी स्वदेशी वस्तू ऑनलाईन विक्रीसाठी केंद्र सरकारकडे प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.


स्वदेशी अभियानासाठी खासदार धनंजय महाडिक यांचे व्यापाऱ्यांशी संवाद
Total Views: 99