बातम्या
गाव वस्ती संपर्क अभियानांतर्गत खासदार धनंजय महाडिक यांची शिये गावाला भेट
By nisha patil - 4/28/2025 8:04:22 PM
Share This News:
गाव वस्ती संपर्क अभियानांतर्गत खासदार धनंजय महाडिक यांची शिये गावाला भेट
कोल्हापूर (२७ एप्रिल) – भाजपच्या गाव वस्ती संपर्क अभियानांतर्गत खासदार धनंजय महाडिक यांनी करवीर तालुक्यातील शिये गावाला भेट दिली. ग्रामपंचायत, शाळा, आरोग्य केंद्र, मंदिरे यांना भेट देवून स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला. त्यांनी गावाच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही दिली.
यावेळी विविध शासकीय योजनांचा आढावा घेतला व स्थानिक नागरिकांशी संवाद साधला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करीत दहशतवादी हल्ल्यातील हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहिली.
शिवाय, आयुष्यमान भारत कार्ड वाटप, अंगणवाडी भेट, आरोग्य सुविधांचा आढावा आणि जैन समाजातील मागण्यांबाबतही संवाद साधण्यात आला.
गाव वस्ती संपर्क अभियानांतर्गत खासदार धनंजय महाडिक यांची शिये गावाला भेट
|