बातम्या
राजारामपुरीत खासदार धनंजय महाडिक यांची स्वदेशी जागर पदयात्रा
By nisha patil - 9/30/2025 12:18:16 PM
Share This News:
राजारामपुरीत खासदार धनंजय महाडिक यांची स्वदेशी जागर पदयात्रा
व्यापाऱ्यांचा स्वदेशी अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वदेशी जागर अभियानाचा प्रसार करण्यासाठी खासदार धनंजय महाडिक यांनी राजारामपुरी परिसरात पदयात्रा काढली. अग्नेयमुखी हनुमान मंदिरापासून सुरू झालेल्या या पदयात्रेत महाडिक यांनी विविध दुकानदार, व्यापाऱ्यांशी संवाद साधत स्वदेशी उत्पादनांचा वापर करण्याचे आवाहन केले.
जीएसटी कपातीमुळे 400 हून अधिक जीवनावश्यक वस्तू स्वस्त झाल्याचे सांगून, स्वदेशी वापरामुळे देश आर्थिकदृष्ट्या सक्षम होईल असे महाडिक यांनी नमूद केले. राजारामपुरीतील सर्व व्यापार्यांनी स्वदेशी अभियानाला पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले.
या उपक्रमास भाजप जिल्हाध्यक्ष विजय जाधव, रूपाराणी निकम, रहिम सनदी यांच्यासह कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
राजारामपुरीत खासदार धनंजय महाडिक यांची स्वदेशी जागर पदयात्रा
|