बातम्या
खासदार धनंजय महाडिक यांचा शिये गाव दौरा...
By nisha patil - 4/29/2025 5:16:32 PM
Share This News:
खासदार धनंजय महाडिक यांचा शिये गाव दौरा...
स्वच्छता मोहिमेत सहभाग व विकासाचा निर्धार
शियेतील सर्वपक्षीय नेत्यांची भेट; शासकीय योजनांचा आढावा आणि आश्वासने
भारतीय जनता पार्टीच्या गाव वस्ती संपर्क अभियानांतर्गत खासदार धनंजय महाडिक यांनी करवीर तालुक्यातील शिये गावाला भेट दिली. ग्रामपंचायत, शाळा, आरोग्य केंद्र, मंदिरे यांना भेट देत स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला. गाव विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही,
असे आश्वासन दिले. विविध शासकीय योजनांचा आढावा घेतला व आशा सेविका, अंगणवाडी कर्मचारी, तसेच ग्रामस्थांशी संवाद साधला. राम मंदिर कारसेवकांचा सत्कार, आयुष्यमान भारत कार्ड, उज्ज्वला गॅस व बांधकाम कामगारांना भांडी वाटपही करण्यात आले. जैन समाज बस्तीला भेट देत सरकारी योजनांमध्ये सहकार्याचे आश्वासन दिले. या दौऱ्यात सर्वपक्षीय नेते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
खासदार धनंजय महाडिक यांचा शिये गाव दौरा...
|