विशेष बातम्या
सातारा–कागल महामार्गाच्या ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट करण्याची खासदार महाडिक यांची मागणी
By nisha patil - 12/12/2025 5:09:28 PM
Share This News:
सातारा–कागल महामार्गाच्या ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट करण्याची खासदार महाडिक यांची मागणी
काम पूर्ण होईपर्यंत टोल थांबवा; महामार्गाच्या दुरावस्थेवर केंद्रात चर्चा
कोल्हापूर: सातारा–कागल महामार्गाचे काम अत्यंत संथ गतीने सुरू असून महामार्गावरील खड्डे, बाह्य वळणे आणि दुरावस्था यामुळे वाहतूक कोलमडली आहे. या पार्श्वभूमीवर नवी दिल्लीतील आढावा बैठकीत खासदार धनंजय महाडिक यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याची मागणी केली. तसेच महामार्गाचे काम पूर्ण होईपर्यंत वाहनधारकांकडून टोल वसुली थांबवावी, असेही त्यांनी स्पष्टपणे सांगितले.
गेल्या सहा महिन्यांत केवळ दोन टक्के काम झाल्याचे उघड झाल्यानंतर गडकरी यांनी त्या ठेकेदारावर कारवाई सुरू केल्याचे स्पष्ट केले. काम दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्यासाठी नवी कंपनी नेमण्याबाबतही विचार सुरू असल्याचे सांगण्यात आले. महामार्गाचे काम लवकर पूर्ण होण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही केली जाईल, असे आश्वासनही बैठकीत देण्यात आले.
सातारा–कागल महामार्गाच्या ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट करण्याची खासदार महाडिक यांची मागणी
|