बातम्या

पदवीधर-शिक्षक मतदारसंघाच्या मतमोजणीसाठी यंत्रणा सज्ज; उद्या निकालाकडे लक्ष!

Machinery in place for the counting of votes


By nisha patil - 10/26/2026 7:30:34 PM
Share This News:



पदवीधर-शिक्षक मतदारसंघाच्या मतमोजणीसाठी यंत्रणा सज्ज; उद्या निकालाकडे लक्ष!

विधान परिषदेच्या पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज झाले आहे. उद्या, २७ ऑक्टोबर रोजी पुण्यातील बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलाच्या बॅडमिंटन हॉलमध्ये मतमोजणी होणार आहे. मतमोजणी प्रक्रिया अचूक, शांततेत आणि समन्वयाने पार पाडण्याचे निर्देश निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले यांनी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दिले आहेत. मतपत्रिकांवरील पसंतीक्रमानुसार मतमोजणी होणार असल्याने प्रत्येक टप्प्यावर विशेष काळजी घेण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

या मतमोजणीसाठी पदवीधर मतदारसंघात १०० टेबल, तर शिक्षक मतदारसंघात ४२ टेबल असणार आहेत. प्रत्येक टेबलवर एक पर्यवेक्षक, दोन सहाय्यक आणि एक शिपाई नियुक्त करण्यात आला आहे. मतपत्रिकांचे वैध-अवैध वर्गीकरण, मतांची अचूक मोजणी आणि प्रत्येक फेरीचा निकाल निर्धारित नियमांनुसार नोंदवण्याचे प्रशिक्षण कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहे. आता या मतमोजणीत कोण बाजी मारणार आणि निकालाचे चित्र काय असणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


पदवीधर-शिक्षक मतदारसंघाच्या मतमोजणीसाठी यंत्रणा सज्ज; उद्या निकालाकडे लक्ष!
Total Views: 14