राजकीय

प्रभाग ९ मध्ये माधवी मानसिंग पाटील यांच्या प्रचार कार्यालयाचा उत्साहात शुभारंभ...

Madhavi Mansingh Patils campaign office inaugurated with enthusiasm in Ward 9


By nisha patil - 6/1/2026 4:25:31 PM
Share This News:



कोल्हापूर महानगरपालिका प्रभाग क्रमांक ९ मधून भाजपकडून निवडणूक लढवत असलेल्या  माधवी मानसिंग पाटील यांच्या प्रचार (प्रसिद्धी) कार्यालयाचा शुभारंभ आज उत्साहात पार पडला. भागातील नागरिकांच्या समस्या थेट जाणून घेऊन त्या जलद गतीने सोडवण्यासाठी या कार्यालयाची स्थापना करण्यात आली आहे.
गेल्या १५ वर्षांपासून माधवी पाटील व मानसिंग पाटील हे आनंद फाउंडेशन व मानसिंग युवा मंचच्या माध्यमातून विविध समाजोपयोगी उपक्रम राबवत असून, ३० वर्षांचा पाटील घराण्याचा सामाजिक वारसा पुढे नेण्यासाठी नागरिकांचा आशीर्वाद व पाठिंबा आवश्यक असल्याचे माधवी पाटील यांनी सांगितले. यावेळी प्रभाग क्रमांक नऊ मधील महायुतीचे सर्व उमेदवार उपस्थित होते.
या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन आमदार अमल महाडिक यांच्या हस्ते फित कापून व श्रीफळ वाढवून करण्यात आले. कार्यक्रमाला भागातील नागरिक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना आमदार अमल महाडिक म्हणाले की, “हे कार्यालय राजकीय कारकिर्दीसाठी नाही, तर राजकारण बाजूला ठेवून विकासाच्या मुद्द्यांसाठी सुरू करण्यात आले आहे. सर्वसामान्य नागरिक हाच आमचा केंद्रबिंदू असल्याचे अमल महाडिक यांनी नमूद केले.


प्रभाग ९ मध्ये माधवी मानसिंग पाटील यांच्या प्रचार कार्यालयाचा उत्साहात शुभारंभ...
Total Views: 39